परशुराम घाटातील घटना, एकाचे नशीब बलवत्तर म्हणून वाचला
चिपळूण, ता. 8 : परशुराम घाटात महामार्गाचे काम सुरु असताना दरड कोसळली. या दरडीखाली जेसीबी सह एक कामगार गाडला गेला आहे. त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील वहातुक थांबविण्यात आली आहे.Workers buried under the rubble.
Mumbai Goa Highway च्या चौपदरीकरणाचे काम परशुराम घाटात वेगाने सुरू आहे. येथे रुंदिकरणासाठी डोंगर खोदला जात आहे. आज डोंगर खोदाई सुरू असताना अचानक दगड मातीचा मोठा ढीग (दरड)(landslide) कोसळला. ही दरड थेट काम करत असलेल्या जेसीबी वर कोसळली. जेसीबी चालकासह आणखी एक मजूर तेथे दरड कोसळताना उपस्थित होता. दोघेही जेसीबी सह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असण्याची शक्यता वर्तविली जात होती.Workers buried under the rubble
मात्र एक मजूर प्रसंगावधान राखत कोसळणाऱ्या दरडीतून धावत सुटला. नशीब बलवत्तर असल्याने तो वाचला. मात्र एकजण जेसीबी सहीत मातीखाली गाडला गेला आहे. सदर घटना घडल्यानंतर तत्काळ आजुबाजुला काम करणारे महामार्गावरील कर्मचारी येथे गोळा झाले. अन्य मशीनरीच्या साह्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.Workers buried under the rubble
दरम्यान मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील वहातूक बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या भागात अजूनही दरड कोसळु शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. Workers buried under the rubble