विवाहामध्ये दिलेल्या भेटवस्तूचा स्फोट होवून नवरा आणि 12 वर्षिय मुलगा जखमी झाल्याची घटना नुकतीच नवसारी (रा. गुजराथ) मध्ये घडली. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु असून धोका टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र भेटवस्तुचा स्फोटाने पोलीसही चक्रावून गेले आहेत. The wedding gift exploded. फेब्रुवारीमध्ये ओरीसामधील पटनागड येथेही अशाप्रकारे भेटवस्तुचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत नवऱ्यामुलासह एकजण गंभीर जखमी झाले होते.


आपल्या मित्रमैत्रीणींच्या विवाहात काही तरी वेगळे, खास, त्याला/तिला आवडेल असे द्यावे असा आग्रह असतो. एकाच्या बजेटमधील वस्तु नसेल तर मित्रमैत्रीणी सहभाग मुल्य (Contribution) काढुन ती वस्तू घेतात. नवसारीमध्येही अशीच घटना घडली. 12 मे रोजी आपल्या मित्राच्या लग्नाला आलेल्या मित्रमैत्रिणींनी एक महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तू मित्राला भेट दिली. भेट देताना मित्राला टीपही देण्यात आली. भेटवस्तू एकट्याने उघडावी. आता लग्नात समयवयस्क मित्रमैत्रिणींची अशी दंगामस्ती चालणारच हे लक्षात घेवून त्या नवरामुलाच्या घरच्यांनी ही भेटही स्वतंत्र ठेवली. लग्न झाले. वरात घरी आली. पुढचे दोन दिवस लग्नानंतरचे सर्व धार्मिक विधी झाले. आता मित्रांनी दिलेल्या भेट वस्तुबाबत नवरामुलाच्या मनात उत्सुकता होती. 17 मे रोजी सकाळी त्याने ती भेटवस्तु उघडण्याचे ठरवले. पत्नीला खोलीतून बाहेर पाठवून तो ती भेट वस्तू उघडू लागला. त्याचवेळी भेटवस्तूचा स्फोट झाला. यामध्ये नवरामुलाचे तोंड, छाती, दोन्ही हात भाजले. हा स्फोट होत असतानाच त्यांच्या घरातील एक 12 वर्षांचा मुलगा तिथे आला होता. तो ही या स्फोटात जखमी झाला. ही घटना नवसारी, गुजराथ येथे घडली. The wedding gift exploded


या दोघांना कुटुंबियांनी खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. तपासासाठी पोलीस घरी आले. त्यांनी स्फोट झालेली भेटवस्तु फॉरॅन्सीक विभागाच्या ताब्यात दिली. तपासाला सुरवात केली. सदर मित्र मैत्रीणींची चौकशी झाली. त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वस्तु घेतलेल्या दुकानापर्यंत पोलीस पोचले. दरम्यान फॉरेन्सीक विभागाचा अहवाल आला. या अहवालात सदर भेटवस्तुमध्ये कोणतीही स्फोटके नव्हती. छोट्या बॅटरीचा स्फोट झाला असावा असे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस आणि कुटुंबिय चक्रावले आहेत. तापमानवाढीमुळे बॅटरीचा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.The wedding gift exploded