भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन ओक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
गुहागर : जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना परराज्यात जाण्यासाठी प्रयत्न करणा-या कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी गुहागर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन ओक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Guhagar BJP Yuva Morcha president Sachin Oak has demanded the district collector to take action against the coroner and his accomplices who were trying to go abroad during the severe lockdown in the district.
जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, गुहागर तालुक्यात एच. एनर्जी कंपनी अंतर्गत अॉईल कंपनीत काम करणारी ३२ वर्षीय नन्नेलाल व्यक्तीची कोरोनाची आरटीपीसारची चाचणी दि. ६ जून रोजी गुहागर येथील रिपोर्ट मध्ये पॉझिटिव्ह आली होती. तरीसुद्धा सदर व्यक्ति वरवेली येथील सारसी गेस्ट हाऊस येथे वास्तव्यास होती. ते आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार होते काय? सदर व्यक्ति ही कोरोना बाधित आल्यावर दोन दिवसांच्या आतच दि. ८ जून रोजी दुपारी परराज्यात उत्तरप्रदेश येथे जाण्यासाठी चिपळूण रेल्वे स्टेशन पर्यंत गेली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः तात्काळ आरोग्य विभाग गुहागर, गुहागर पोलिस स्थानकात संपर्क साधून माहिती दिल्यानंतर सदर व्यक्तिला पुन्हा गुहागर तालुक्यात आणण्यात आले, असे समजले. दि. २८ मे २०२१ रोजी आपल्या सहीशिक्यासहित माझे गाव माझी जबाबदारी या परिपत्रकात पॉझिटिव्ह व्यक्तिस संस्थात्मक अलगिकरणात ठेवण्याचा, पॉझिटिव्ह व्यक्तिने बाहेर न फिरण्याचा तसे आढळल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. असे असताना बाहेरील राज्यातील नन्नेलाल ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर तिला संस्थात्मक अलगिकरणात का ठेवण्यात आले नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच सदर व्यक्ति पॉझिटिव्ह असताना ती चिपळूण रेल्वे स्टेशन पर्यंत पोहचलीस कशी ? कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर सदर व्यक्ती वरवेली येथील सारसी गेस्ट हाऊस येथे वास्तव्यास होती हे नियमानुसार आहे काय? संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित व्यक्तीला नेमके कोठे विलगीकरणात रहावयास सांगितले होते?असे अनेक सवाल उठत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी वेगळा आणि कंपनीतील बड्या व्यक्तिंसाठी वेगळा कायदा आहे काय? असा सवाल केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण किंवा आपत्कालीन परिस्थिती सोडून वाहतुक पूर्णतः बंद आहे. कंपनीची गाडी नेमकी कोणत्या आस्थापनेत मोडते?त्यांना वाहतुकीसाठी परवानगी होती काय? कोरोना बाधित व्यक्ती अशाप्रकारे बाहेर फिरल्याने तसेच सदर व्यक्ति परराज्यात जाण्यासाठी यशस्वी झाली असती तर प्रवासादरम्यान त्या व्यक्तीपासून कोरोनाचा संसर्ग वाढला असता त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न पडत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब जनता गेले दोन महिने लॉकडाऊनमुळे हतबल झाली आहे. आर्थिक उलाढाल थांबली आहे. तरीही प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन ही जनता करत आहे. मग कंपनीतील बड्या व्यक्तिंसाठी हे कडक नियम का नाहीत? ते राजरोसपणे बाहेर फिरत आहेत. त्यांना नक्की कोणाचे अभय आहे ? या सर्व गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार करून संबंधित विभागांकडून योग्य ती माहिती घेऊन लॉकडाऊनच्या काळात बेकायदेशीरपणे कोरोना बाधित व्यक्तिने परराज्यात जाण्यासाठी प्रवास केल्याने त्याच्यावर तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या व्यक्तिंवर, कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर सदर व्यक्ति ज्या ठिकाणी राहत होती. त्या गेस्ट हाऊसवर तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित विभागाच्या व्यक्तिंवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सचिन ओक यांनी केली आहे.