• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमेदवाराला शुभेच्छा देवून त्यांनी केली आत्महत्या

by Mayuresh Patnakar
January 15, 2021
in Old News
16 0
0
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अडूरमधील घटना, नाशिकहून आले होते मूळ गावी

गुहागर, ता. 15 :  तालुक्यातील अडूर येथे श्री देव  त्रिविक्रम नारायण मंदिरालगतच्या विहिरीमध्ये उडी घेऊन 56 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केली आहे. संजय दत्तात्रय केळकर असे त्यांचे नाव असून ते नाशिकला रहातात. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार असलेल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी ते अडूरमध्ये आले होते.
संजय केळकर यांचे मोठे बंधु राजेंद्र केळकर (रा. चिपळूण) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केळकरांचे मुळ गाव अडूर. संजय केळकर हे नाशिकला (Nashik) रहातात. तेथे ते आयुर्विमा प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. 15 वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अधुनमधुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडत असे. शुक्रवारी सकाळी नाशिकवरुन संजय केळकर हे आपल्या मूळ गावी अडूर येथे आले होते. त्यांचा अडूर गावातील एक मित्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार आहे. संजय केळकर यांनी त्याची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री देव त्रिविक्रम नारायण मंदिरात ते दर्शनाला गेले. त्यानंतर मंदिरालगत असलेल्या विहीरीत उडी टाकून त्यांनी आत्महत्या केली. (Suicide in Adur)
सदर घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी गावातील मित्राला आणि अन्य ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी संजय केळकर यांचे मोठे बंधु राजेंद्र केळकर यांना चिपळुणहून बोलावून घेतले. पोलीसांनी संजय केळकर यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार गणेश कादवडकर करीत आहेत.

Tags: Breaking NewsCrime NewsGuhagarGuhagar NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarSuicideTop newsआत्महत्यागुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.