गुहागर ता. 17 : 5 महिन्याहून अधिक काळ बंद असलेल्या गुहागर आगारात आज यांत्रिक विभागातील सर्व कर्मचारी आणि काही चालक वाहक हजर झाले. त्यामुळे गुहागरातून रात्री सुटणाऱ्या मुंबई, पुणे, भांडूप आणि बोरिवली या गाड्या मार्गस्थ झाल्या आहेत. दि. 18 एप्रिल पासून नित्य वेळापत्रकाप्रमाणे वहातूक सुरू होणार आहे.(ST workers on work)
विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिने गुहागरमधील एस.टी. कामगार संपात सहभागी झाले होते. संप कालावधीत मोजकेच लोक संपातून बाहेर पडले. त्यांना चिपळूण आगारात सामावून घेण्यात आले होते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मा. न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत हजर होण्यास सांगितले होते. या आदेशानुसार एकाच दिवशी एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व आगारात हजर होण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला होता.ST workers on work
दरम्यान मा. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्याच्या आवारात निदर्शने केली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांचे वकील सदारत्न गुणवर्ते यांना अटक करण्यात आली. नंतर वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली त्यांना तुरुंगात रहावे लागत आहे.ST workers on work
या पार्श्वभूमीवर फारसा गाजावाजा न करता 18 एप्रिल पासून एसटीचे संपापुर्वीचे वेळापत्रक सुरळीत करण्याचा निर्णय एसटी कामगारांनी घेतला. 18 एप्रिलला आगारातील सर्व गाड्या रस्त्यावर धावणार असतील तर त्या पाच महिने बंद असलेल्या गाड्यांची तपासणी, देखभाल करणे आवश्यक होते. म्हणून 138 एसटी कर्मचारी 17 एप्रिल रोजी हजर झाले. यामध्ये 53 चालक, 25 वाहक, 27 चालक /वाहक आणि प्रशासन, यांत्रिक विभागाचे 33 कर्मचारी यांचा समावेश आहे.ST workers on work
गुहागर आगारातून रात्री सुटणाऱ्या बोरिवली, भांडूप, पुणे आणि मुंबई या गाड्या आज (ता. 17) मार्गस्थ झाल्या आहेत. 18 तारखेला एकूण 27 फेरी धावणार आहेत. वस्तीच्या ठिकाणाहून सुटणाऱ्या गाड्या देखील सोडण्याचा प्रयत्न ही सुरू आहे.