स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 18 नखे घेतली ताब्यात
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील मुंढर फाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या गेट समोर वाघ व बिबट्याच्या 18 नखांची तस्करी करताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी यांनी रंगेहात पकडले. ही घटना मंगळवारी सायं. 5 वा. घडली. रात्री उशिरा सदर घटनेचा तपास गुहागर पोलीस ठाण्याकडे दिल्यानंतर गुहागर पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.
Local Crime Branch (LCB)Team caught Two persons, While smuggling Tiger and Leopard claws in front of the gate of Spring Company at Mundhar Fata in Guhagar taluka. At this time, 14 tiger claws have been found in the possession of the accused. After Enquiry LCB handovered Dilip Chalake and Akshay Paradhi to Guhagar Police. Guhagar Police arrested both late night under Wild Life Protection Act 1972
रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेला गुहागरातून वाघनखे व बिबट्याच्या नखांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे गुहागर तालुक्यातील मुंढर फाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या परिसरात मंगळवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने सापळा रचला होता. सायंकाळी 5 च्या सुमारास दुचाकीवरुन (क्र. एम. एच. 12 इ. वाय 3232) जाणाऱ्या दिलीप सिताराम चाळके, (वय ४०, रा. मुंढर चाळकेवाडी) व अक्षय आत्माराम पारधी (वय २४, रा. आमशेत पेवे भोईवाडी) यांना पोलीसांनी पकडले. त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे वाघ व बिबट्याची 18 नखे सापडली. टोकदार नखांच्या एका बाजुला मांसल व हाडाचा भागही होता. वन्य जीवांच्या अवयवांची वहातूक करण्याचा कोणताही परवाना त्यांच्याकडे नव्हता. तसेच या नखांची विक्री करण्याचा त्यांचा उद्देश चौकशीत समोर आला. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी या दोघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांचे मोबाईल आणि दुचाकीही जप्त करण्यात आली.
संपूर्ण चौकशी आणि पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके व सहकाऱ्यांनी रात्री 1 वा. घटनास्थळाला भेट देवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
याप्रकरणी गुहागर पोलिसांनी नखांची तस्करी करणाऱ्या दोघांविरोधात भा. दं. वि. कलम वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39, 44, 48,51 प्रमाणे गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री उशिरा दिलीप चाळके व अक्षय पारधी यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम करीत आहेत.