• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 March 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

असगोली येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा

by Guhagar News
March 31, 2026
in Guhagar
25 0
0
Shri Hanuman Janmatsav at Asgoli
49
SHARES
139
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गुहागर ता. 31 : प्रतिवर्षा प्रमाणे श्री हनुमान सेवा मंडळ, असगोली यांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवार दि. 02 एप्रिल 2026 आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रेकॉर्ड डान्स व सांस्कृतिक कार्यक्रम, श्री सत्यनारायण महापूजा, पालखी मिरवणूक, आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घेऊन कार्यक्रमास उपस्थित रहावे, अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे. Shri Hanuman Janmatsav at Asgoli

श्री हनुमान जन्मोत्सव सोहळानिमित्त गुरुवार दि. 02 रोजी स. 6 वा. श्री हनुमान जन्मकथा वाच, सकाळी 6.20 वा. जन्मकाळ, स.  7 ते 7.30 वा. श्रींची आरती, सकाळी 8.30 वाजल्यापासून तिर्थ प्रसाद, दु. 12 ते 2 वा. महाप्रसाद, सायं. 3  ते 7 वा. पालखी मिरवणूक, सायं. 7.30 वा. श्रींची आरती, त्यानंतर  सुस्वर भजनाचा कार्यक्रम (नूतन ज्ञानेश्वर सामाजिक भजन मंडळ किर्तनवाडी गावडे विभाग बुवा. श्री. विनायक पांडुरंग जोशी, पखवाज. यश पानकर व अनंत गावडे, तबला. अभय साटले.) (स्वर साधना महिला भजन मंडळ गुहागर- खालचापाट बुवा. आदिती गणेश धनावडे, पखवाज. श्री. संदेश हुमणे) (आई नवलाई प्रासादिक महिला भजन मंडळ हेदवतड, गुहागर बुवा. ईश्वरी गजानन ढोर्लेकर, पखवाज, क्रिश विनायक हेदवकर) (श्री कालिकामाता प्रासादिक महिला भजन मंडळ धोपावे, गुहागर बुवा. तेजल जाधव, पखवाज अजिंक्य कुरधुंडकर, तबला श्रीधर विचारे) Shri Hanuman Janmatsav at Asgoli

शुक्रवार दि. 03 रोजी रात्रौ 10 वाजता श्री गादीवाला महापुरुष नाट्यमंडळ प्रस्तूत लेखक-सचिन फुटक, दिग्दर्शक-प्रमोद घुमे, सह दिग्दर्शक-राजेश धनावडे नाट्य “अखेरची अंगाई” सादर होणार आहे.
शनिवार दि. 04 रोजी रात्रौ 10.30 वाजता शक्ती- तुरा नाचाचा जंगी सामना कलगी वाले शाहीर श्री राजेश निकम, सवणे, खेड विरुध्द तुरेवाले शाहिर श्री सचिन धुमक, ढाकमोली, चिपळूण.
रविवार दि. 05 रोजी रात्रौ 10 वाजता रेकॉर्ड डान्स
तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान सेवा मंडळ, असगोली यांनी केले आहे. Shri Hanuman Janmatsav at Asgoli

Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShri Hanuman Janmatsav at Asgoliटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.