महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान; विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप
गुहागर, दि. 22 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रद्धा रोहीलकर व वेदिका जाधव यांनी केले. यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. Shiv Jayanti at Veldur


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे थोर महापुरुष होते. रयतेचे कैवारी होते. त्यांची दूरदृष्टी, युद्ध कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, अष्टप्रधानमंडळ, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची तयारी, सर्वधर्मसमभावपणा, स्त्रियांप्रति आदर, त्यांच्या या विचारांची आज देशाला गरज आहे. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. असे प्रतिपादन तंत्रस्नेही शिक्षिका निलोफर शेख यांनी केले. Shiv Jayanti at Veldur
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, वेलदुरचे माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, सामाजिक कार्यकर्ते देवराम भोसले, शंकर कोलथरकर, दिग्दर्शक संदीप वनकर ,मारुती रोहीलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सानिया वनकर, विशाखा नाटेकर, सुवर्णा कोलथरकर ,अंगणवाडी मदतनीस कदम, वेलदुर हायस्कूलचे मुख्याध्यापक पावसकर सर, साठे सर, दाभोळकर मॅडम ,पल्लवी घुले, मुद्दमवार मॅडम, शंकर कोलथरकर ,अंजली मुद्दमवार, मारुती रोहीलकर, मनोज पाटील, नंदकुमार रोहीलकर, संदीप वनकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. Shiv Jayanti at Veldur
त्यावेळी वक्तृत्व स्पर्धा, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, गोळाफेक आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक संघ, माता संघ, युवा कार्यकर्ते, महिला मंडळ, वेलदुर हायस्कूल व नवानगर मराठी शाळा यांचे विद्यार्थी उपस्थित होते. Shiv Jayanti at Veldur

