• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भातगाव खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा

by Ganesh Dhanawade
November 20, 2020
in Old News
16 0
0
भातगाव खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रशासनाला दिसूनही दुर्लक्ष

गुहागर : तालुक्यात वाळू उत्खनन करण्यास बंदी असतानाही गुहागर मधील हेदवीसह परचुरी, वडद, भातगाव खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल यंत्रणेचा डोळा चुकवत हा उपसा केला उपसा केला जात असल्याचे चित्र भासवले जाते. मात्र, सुरू असलेला वाळू उपसा प्रशासनाला माहीत असूनही त्यावर कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील हेदवी, नरवण तसेच भातगाव खाडी लागत सध्या मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वाळू काढली जात आहे. परिणामी शासनाच्या महसुला सोबत पर्यावरणाची देखील हानी होत आहे. हेदवीच्या किनाऱ्यावर तर वाळूची वाहतूक करण्यासाठी वाळूमाफियांनी संरक्षण भिंत फोडून रस्ता तयार केला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कामगिरीबाबत लोकांची नाराजी व्यक्त होत आहे. कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरावी लागत नसल्यामुळे तालुक्यात वाळू माफिया वाळूचा उपसा करत आहेत. सध्या परवानगी नसल्यामुळे वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे अवैधरित्या वाळू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही वाढली आहे.
भातगाव खाडीत रात्री बरोबरच दिवसाचे वाळू उत्खनन केले जात आहे. भातगाव खाडी तालुक्याच्या ठिकाणाहून लांब असल्याने कारवाईसाठी प्रशासनाचा कोणी येत असेल तर आधीच माहिती वाळू व्यावसायिकांना मिळत असते. त्यानंतर प्रशासनाकडून कारवाईचा फार्स म्हणून कधीतरी वाळूच्या रिकाम्या वाहनांवर कारवाई केली जाते. प्रशासनाच्या ढिलाईमुळे भातगाव खाडीत मोकाटपणे वाळू उपसा सुरू असल्याचे सध्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Tags: BeachGuhagarGuhagar NewsinvornmentMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्याभातगावमराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.