धर्माधिकारी प्रतिष्ठान, तालुक्यातील 173 श्रीसदस्यांचा सहभाग
गुहागर,दि. 02 : महाराष्ट्र भुषण डाँ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डाँ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, जि. रायगड यांच्या वतीने मंगळवार दि. 1 मार्च 2022 रोजी गुहागर शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सकाळी 7.30 वाजता सुरू झालेली साफसफाई दुपारी 1 वाजता थांबली. या दरम्यान गुहागर तालुक्यातील 173 श्रीसदस्यांनी मुख्य रस्त्यासह शासकीय कार्यालयाचा परीसर स्वच्छ केला. शहरातून एकूण 20 टन ओला व सुका कचरा श्रीसदस्यांनी गोळा करून तो गुहागर नगरपंचायतीने दर्शवलेल्या ठिकाणी टाकण्यात आला. Sanitation Campaign in Guhagar

सर्व श्रीसदस्यांनी साफसफाईसाठी लागणारे साहित्य व वस्तू सोबत आणल्या होत्या. तसेच कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी अनेक वाहने आणण्यात आली होती. शहरातील पं. स. गुहागर, नगरपंचायत, तहसिल कार्यालय, तालुका आरोग्य कार्यालय, पशुवैद्यकिय कार्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, जिवन शिक्षण शाळा, ग्रामिण रूग्णालय गुहागर इ. परिसराची दुतर्फा साफसफाई करण्यात आली. कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी न करता सदर साफसफाई काम करण्यात आले. Sanitation Campaign in Guhagar

सदर अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी गुहागर तहसिलदार प्रतिभा रवाळे, गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेशजी बेंडल, गुहागर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रणिता साटले, गुहागर नगरपंचायतीचे गटनेते उमेशजी भोसले, गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य स्वच्छता सभापती प्रसादजी बोले, गुहागर नगरपंचायतीचे अधिकारी श्री. पेढांबकर आदि मान्यवर उपस्थित होते.

मा. तहसिलदार मॅडम व नगराध्यक्ष साहेब यांनी डाँ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा व प्रतिष्ठानच्या कामकाजाचा व श्रीसदस्यांचा गौरव व कौतुक केले. Sanitation Campaign in Guhagar

सदर कार्यक्रमाला शहरातील सर्व श्रीसदस्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दर्शविला व श्रीसद् गुरू कृपेने उत्तम पार पडले. Sanitation Campaign in Guhagar

