• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संस्कृत पाठशाळा येथे ऋग्वेद घनपारायण आणि वैदिकांचा सत्कार

by Guhagar News
February 13, 2026
in Ratnagiri
38 0
0
75
SHARES
213
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : रत्नागिरी जिल्ह्यातील वेद आणि शास्त्र या विषयांतील दोन दिग्गज विभूती वे. मू.वैदिकमार्तंड, वैदिक शिरोमणी कै. विनायक सी. आठल्ये गुरुजी आणि व्याकरणाचार्य कै. पु. ना. फडके शास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली पाच वर्षे गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याही वर्षी पौष शु. ५ ते फाल्गुन शु. ५ (२५ डिसेंबर २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२६) या कालावधीत कंठस्थ ऋग्वेद घनपारायण आयोजित केलेले आहे. रत्नागिरीत प्रथमच अशा प्रकारचे पारायण होत आहे. Rigveda Ghan Parayan at Sanskrit Pathshala

प्राचीन काळापासून भारतीय वैदिक परंपरा संवर्धन केली गेली ती गुरुकुल शिक्षणपद्धतीमुळेच. गुरुमुखातून प्राप्त झालेली ही वेदविद्या आजच्या विज्ञान युगातही अक्षर, मात्रा, स्वर यांचा किंचितही बदल न होता जपली गेली ती मौखिक परंपरेतून. वेदाध्ययन करायचे झाल्यास प्रखर बुद्धिमत्ता, वेदनिष्ठा, आणि अभ्यासाचे कष्ट करण्याची तयारी हे गुण आवश्यक आहेत. प्राचीन पद्धतीने वेदाध्ययन करताना घनपाठापर्यंतचे अध्ययन पूर्ण करण्यासाठी बारा वर्षांचा कालावधी लागतो. Rigveda Ghan Parayan at Sanskrit Pathshala

ऋग्वेद संहिता ग्रंथात साडेदहा हजारांहून अधिक ऋचा आहेत. या ऋचांमधील शब्दांचे संधी सोडवून प्रत्येक पद हे पदपाठ ग्रंथात म्हटले जाते. या पदपाठाच्या आधारेच जटा, माला, शिखा, रेखा, रथ, दंड, ध्वज, घन या अष्टविकृती म्हटल्या जातात. यापैकी शेवटची आणि सर्वात कठीण असलेली घनपाठ ही विकृती आहे. घनपारायण करण्यासाठी दररोज ५ तास गृहीत धरल्यास दोन महिन्यांचा कालावधी लागतो. हे पारायण करताना समोर ग्रंथ न ठेवता केवळ मुखोद्गत ऋग्वेद घनपाठ म्हटला जातो आणि श्रवण करण्यासाठी एक घनपाठी विद्वान श्रोता उपस्थित असावा लागतो. अशाच पद्धतीने संस्कृत पाठशाळेमध्ये वे. मू. श्री. विश्वंभर वैजनाथ कानशुक्ले हे कंठस्थ ऋग्वेद घनपारायण करत आहेत आणि वे. मू. घनपाठी श्री. रामचंद्र भास्कर मुंडले गुरुजी (तेंडोली) हे श्रोता म्हणून उपस्थित आहेत. दररोज सकाळी ८:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत पारायण चालू असते. इच्छुकांनी पारायण श्रवणाचा लाभ अवश्य घ्यावा. Rigveda Ghan Parayan at Sanskrit Pathshala

या पारायणाला अनुसरूनच दि. २०,२१,२२ फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी ५:०० ते ६:३० या वेळेत श्री. प्रणव गोखले यांच्या रसाळ वाणीतून परशुराम चरित्र ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:००वाजता वे.मू. घनपाठी श्री. दत्तात्रेय महादेव मुरवणे गुरुजी यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ अधिकाधिक लोकांनी करून घ्यावा. Rigveda Ghan Parayan at Sanskrit Pathshala

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsMarathi NewsNews in GuhagarRigveda Ghan Parayan at Sanskrit Pathshalaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share30SendTweet19
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.