रात्रीत कारवाई, 5 वाहने ताब्यात, 2 लाखांच्या दंड वसुलची नोटीस
गुहागर, ता. 15 : मंडल अधिकारी सचिन गवळी आणि त्यांचे सहकारी सुशिल परिहार यांनी रात्रीच्या वेळी आबलोली परिसरात अवघ्या दोन तास वाळूच्या 5 गाड्या पकडल्या. सदर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरु असून एकूण 2 लाख 1 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. सदर वाहनचालकांनी ही वाळु रत्नागिरी तालुक्यातील राई येथून आणल्याचे सांगितले आहे.
सोमवारी (ता. 14) रात्री 11 ते 1 या दरम्यान मंडल अधिकारी सचिन गवळी आणि तलाठी सुशिल परिहार आबलोली असोरे, काजुर्ली या भागात ग्रस्त घालत होते. सुरवातील आवरे फाटा येथे एमएच 08 एक्यु 5757 या वाहनातू अवैध वाळु वहातूक होत असल्याचे लक्षात आले. ही गाडी शृंगारतळीतील बांधकाम व्यावसायिक इम्रान घारे यांच्या मालकीची आहे. सदर वाहनात 1 ब्रास वाळु होती. हे वाहन ताब्यात घेतल्यानंतर सचिन गवळी यांनी जागा बदलली. असोरे फाटा येथे ते थांबले असता अवैध वाळु वहातूक करणाऱ्या चार वाहनांवर गवळी व परिहार यांनी कारवाई केली. यामध्ये प्रसन्न पाटील शृंगारतळी यांच्या मालकीचे एमएच 08 एच 1138 वाहनात १ ब्रास, संजोग रावणंग, रा. श्रृंगारतळी एमएच 08 1314 या वाहनात अर्धा ब्रास, पांडुरंग पाष्टे , कोतळूक एमएच 11 2453 अर्धा ब्रास, विजय पवार, चिखली याचे वाहनात 1 ब्रास वाळू आढळून आली. मंडल अधिकारी आणि तलाठ्यांनी सर्व वाहने जप्त केली. मंगळवारी सकाळी पंचनामा करुन पाचही वाहनमालकांना दंड भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये इम्रान घारे, प्रसन्न पाटील व विजय पवार यांना प्रत्येकी रु. 50 हजार 400 व संजोग रावणंग, पांडुरंग पाष्टे यांना प्रत्येकी रु. 25 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.