पहिल्याच प्रयत्नात पारितोषिकाचा मानकरी!
गुहागर : गुहागर तालुका मराठा कर्मचारी मंच आयोजित स्पर्धेत सहभागी झालेल्या मौजे निवोशी येथील कु. सुजल ज्ञानदेव कुळे हा त्याच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तेजनार्थचा मानकरी ठरला आहे. त्याने प्रतापगड प्रतिकलाकृती साकारून महाराष्ट्राला लाभलेल्या इतिहासाप्रति आठवणी जाग्या केल्या. त्याच्या पहिल्याच यशस्वी प्रयत्नांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
From Nivoshi who participated in the competition organized by Guhagar Taluka Maratha Karmachari Manch Sujal Dnyandev Kule has become a standard of encouragement in his first attempt. He commemorated the history of Maharashtra by constructing the Pratapgad iconography. Congratulations are pouring in from all levels for his first successful endeavor.
दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलांना विशेष आकर्षण असते ते ऐतिहासिक किल्ल्याचे! मग ते शहरी भाग असो किंवा ग्रामीण सगळीकडेच शाळेतील ही लहान मुले किल्ला बनवण्याचा छंद जोपासत असतात. असाच एक छंद जोपासण्याचा प्रयत्न केलाय निवोशी दणदणेवाडी येथील कु. सुजल ज्ञानदेव कुळे या रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय-पालशेत या शाळेच्या इयत्ता नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने.
मुळचा चिपळूण-कामथे येथील असलेला कु. सुजल सद्या त्याच्या मामाच्या गावी मु. निवोशी येथे स्थायिक आहे. घरची परिस्थिती बेताची, वडिलांचे सततचे आजारपण, या सर्व परिस्थितीला सामोरे जात, आपले शिक्षण आणि आपले दैनंदिन अभ्यासक्रम सांभाळत, फावल्या वेळेत घरच्यांना शेतीच्या कामात मदत करतो. घरी आर्थिक मदत व्हावी म्हणून सुटीच्या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे छोटं- मोठं काम करत, आपल्या आईला घरी शक्य तेवढी मदत करण्याबरोबरच आपल्या अंगी असलेले छंद जोपासण्याचा त्याचा परिपूर्ण प्रयत्न असतो. त्याच प्रयत्नांना यशप्राप्ती मिळाल्याचा आंनद त्याच्या आई वडिलांइतकाच संपूर्ण निवोशी पंचक्रोशीतीत होत आहे. प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारताना त्याला मदतनीस लाभलेले त्याचे मित्र आणि सहकारी कु.रोहित रमेश दणदणे, कु. प्रथमेश सुरेश दणदणे, कु. अनुश्री सुरेश दणदणे, कु. कुणाल अनिल दणदणे, कु. नेहाली संदिप दणदणे, कु. रसिका एकनाथ दणदणे, श्री अनिल दणदणे हे सर्वच माझ्या यशाचे खरे वाटेकरी आहेत असे तो आवर्जून सांगतो. कु. सुजल कुळे याने अजून दोन ठिकाणी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.