• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

by Ganesh Dhanawade
September 30, 2020
in Old News
20 0
0
रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण : चिपळूणचे नेते माजी आमदार श्री. रमेशभाई कदम यांचा आज बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. श्री. जयंत पाटील, कोकणचे नेते खासदार श्री. सुनील तटकरे, चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम, प्रदेश युवकचे श्री. राकेश चाळके, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेशजी शिर्के, खेर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. दशरथ दाभोळकर, पंचायत समिती सदस्य श्री. नितीन ठसाळे, मंडणगड राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री.प्रकाश शिगवण व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला.
 रमेश कदम यापूर्वी भारतीय जनता पार्टीत गेले होते. मात्र लोकसभा विधानसभा निवडणुकांपूर्वीच ते भारतीय जनता पार्टी मधून काँग्रेस मध्ये गेले. त्यानंतर काही काळ त्यांच्याकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. मात्र कोरोनाच्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या ते लक्षात आलेले नाही. रमेश कदम पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच आपल्या मूळ पक्षात परत आले आहेत. खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांची  पक्षापलिकडची मैत्री सर्वश्रुत आहे.

Tags: aamdar Shekhar NikamCoronaGuhagarGuhagar NewsJayant PatilMarathi NewsNCPNews in GuhagarSanjay KadamSunil Tatkareकोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.