गुहागर : महाराष्ट्राभर कार्यरत असलेल्या कृषि पदवीधर विद्यार्थी संघटनेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी आबलोली येथील युवा सामाजिक कार्यकर्ता रजत सचिन बाईत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील पदवीधर युवक, विद्यार्थी, शेतकरी कृषिवलांचे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृषि पदवीधर विद्यार्थी संघटना विविध उपक्रम राबविते. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस पाटील यांनी संघटनेच्या गुहागर तालुकाध्यक्ष पदी रजत बाईत नियुक्ती केली आहे. रजत बाईत हे आबलोली पंचक्रोशीतील गावात विविध सामाजिक काम करत असतात. आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग तालुक्यातील शेतकर्यांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून रजत बाईत यांचे अभिनंदन होत आहे.