• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज भोसलेची राज्य स्पर्धेसाठी निवड

by Manoj Bavdhankar
December 16, 2021
in Sports
16 0
0
Raj selected for state competition

Raj selected for state competition

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गो.कृ.विद्यामंदिरचा विद्यार्थी;  किशोर गटातून खेळणार

गुहागर, ता. 16 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरमधील राज दिनेश भोसले या विद्यार्थ्यांची निवड कबड्डीच्या जिल्हा संघात झाली आहे. 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत पाथरी, जि. परभणी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत किशोर गटात राज  जिल्ह्याच्या संघातून खेळणार आहे. (Raj Bhosale selected for state competition)

Maharashtra state Kabaddi championship to be held at Pathri, Dist. Parbhani, From 20th to 22nd December. For this tournament Raj Dinesh Bhosale from Shri Dev Gopalkrishna Madhyamik Vidyamandir Guhagar has been selected in the district team of Kabaddi. Raj will play in the youth group from the district team. (Raj selected for state competition)

क्रीडा क्षेत्रात गुहागरमधील  गो. कृ. विद्यामंदिरचे विद्यार्थी सातत्याने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे स्पर्धा आणि सराव सर्वच बंद होते. मध्यंतरी कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर काही काळ स्पर्धांना सुरवात झाली होती. यावर्षी चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली येथे जिल्हा अजिंक्यपद पार पडली. या स्पर्धेत गुहागर संघाकडून राज भोसले खेळत होता. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे जिल्हा क्रिडा विभागाने त्याची निवड जिल्हा संघात केली आहे. (Raj selected for state competition)

राज भोसले जिल्हा संघाचे प्रशिक्षण आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रत्नागिरीला रवाना झाला आहे. तत्पुर्वी त्याला शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम गो. कृ. विद्यामंदिरमध्ये झाला. या कार्यक्रमाला विद्यामंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कनगुटकर उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर राजची राज्याच्या संघात निवड व्हावी. अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, राजचे वडिल दिनेश भोसले, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पर्यवेक्षक कोरकेसर यांच्या सह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

वेळेणेश्र्वर महाविद्यालच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Raj selected for state competition

In sports, S.D.G.K. Vidyamandir’s students are consistently playing at the state, national and international levels. The Corona epidemic has closed competition and practice for the past two years. The competitions had been going on for some time after the first wave of intermediate corona subsided. This year the district level kabaddi tournaments were held at Kumbharli, Tal. Chiplun. Raj Bhosale was playing for Guhagar team in this tournament. Due to his excellent performance, the district sports department has selected him in the district team.

Tags: championshipGuhagarGuhagar NewsKabaddiLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRaj selected for state competitionsportsTournamentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.