• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समुहगीत स्पर्धेत राधाकृष्ण महिला मंडळ प्रथम

by Mayuresh Patnakar
August 8, 2022
in Guhagar
17 0
0
Patriotic song singing competition
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्र सेविका समितीने केले होते स्पर्धेचे आयोजन ; 6 संघ सहभागी

गुहागर, ता. 08 : देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेमध्ये राधाकृष्ण महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावाला. हिरकणी महिला बचत गटाचा द्वितीय तर कात्यायनी महिला मंडळाचा तृतीय क्रमांक आला. राष्ट्र सेविका समितीने या स्पर्धांचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे रविवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असतानाही या स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातील 6 महिलांचे संघ गुहागरमध्ये उपस्थित होते. Patriotic song singing competition

ऑगस्ट क्रांती दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्र सेविका समिति शाखा गुहागरतर्फे महिलांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा परशुराम सभागृहात  ७ ऑगस्टला  झाली. स्पर्धेचे उद्‌घाटन गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी केले. यावेळी व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दूल भावे, राष्ट्र सेविका समितिच्या जिल्हा कार्यवाहिका अपर्णा आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. गुहागर, वेळंब, मळण येथील एकूण 6 संघ स्पर्धेत  सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक राधाकृष्ण महिला मंडळ, गुहागर यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक हिरकणी महिला बचत गट, गुहागरने पटकावला. तर  कात्यायनी महिला मंडळ, गुहागर यांना तृतीय क्रमांक मिळाला. Patriotic song singing competition

Patriotic song singing competition
Patriotic song singing competition
Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPatriotic song singing competitionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.