पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली
गुहागर : तालुक्यातील काही गावात भातशेती नदी परिसर अथवा सखल भागात आहे. तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लावण्या पूर्ण केल्या असल्या, तरी सद्य:स्थितीत पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने डोंगर उतारावरील शेतकऱ्यांच्या शेतातील भातलावण्या पावसा अभावी संकटात सापडल्या आहेत. लागवडीसाठी तयार झालेली रोप उन्हाच्या तडाख्यात होरपळण्याची भीती शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे.
In some villages of the taluka, paddy cultivation is in the river area or in low lying areas. Although the farmers have completed the planting in their fields, at present the paddy fields on the hill slopes are in dire straits due to lack of rains. Farmers are expressing fears that the seedlings ready for planting will be hit by the heat.
गुहागर शहर परिसर व ग्रामीण भागात काही शेतकरी गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या बाजूच्या ओढ्या-नाल्यांमधून पंप लावून पाणी शेतात आणून लावणी करण्याचा प्रयत्न करताना सध्या दिसत आहेत. आगामी काही दिवस पाऊस पडला नाही, तर शेतातील लावणी योग्य रोप करपण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यापासून कोकणात पावसाने दडी मारल्याने ऐन भात लावणीच्या हंगामात शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. भाताची पेरणी झाल्यानंतर आवण काढून भाताची लावणी करण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता असते. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने गुहागर तालुक्यातील डोंगर उतारावर शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे.
गतवर्षी अतिवृष्टी व वादळात उभे ,पीक नष्ट झाले, तर यावर्षी पेरणी योग्य पाऊस पडला असला तरी उगवलेल रोप लावणीसाठी शेतात चिखल करण्यासाठी मात्र पाऊस नसल्याने उन्हात रोपे नष्ट झाल्यास दुबार पेरणी करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात संकटात सापडल्याने एका बाजूला कोरोनाच्या साथीने लॉकडाऊन झाल्याने नोकरी हिरावली. त्यात लहरी हवामानामुळे शेतीतील तोंडचा घास हिरावण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट जाणवत आहे.