• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणच्या जलप्रवासाचा नवा अध्याय सुरू

by Guhagar News
March 4, 2026
in Maharashtra
63 0
0
New chapter in Konkan's water journey
123
SHARES
352
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स सेवेचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

सिंधुदुर्ग, ता. 04 : मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि  मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा आज मोठ्या उत्साहात  शुभारंभ सोहळा संपन्न झाला. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून आणि फीत कापून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. भाऊचा धक्का, मुंबई येथून या सेवेची पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना झाली. New chapter in Konkan’s water journey

New chapter in Konkan's water journey

पहिल्या फेरीला मुंबईकर चाकरमानी व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही रो-पॅक्स सेवा मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या पायाभूत सुविधा आणि सागरी विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानली जाते. राज्यातील सागरी वाहतूक अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. “कोकण आणि मुंबई यांना अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी जलवाहतूक हा सर्वोत्तम पर्याय आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचतील. या रोरो-पॅक्स सेवेमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर कोकणातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय, स्थानिक व्यापार आणि उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन क्षेत्रात वाढ होऊन स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.  New chapter in Konkan’s water journey

New chapter in Konkan's water journey

कोकणातील नागरिकांसाठी आणि विशेषतः मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार असून येत्या काळात ही रो-पॅक्स सेवा मुंबई-कोकण वाहतुकीचा एक मुख्य पर्याय ठरेल, असा विश्वास आजच्या प्रवाशांनी व्यक्त केला आहे. ही रो रो-फेरी बोट सुमारे ६२५ प्रवासी क्षमतेची असून त्यामध्ये एकाच वेळी ४० चारचाकी वाहने आणि २५ दुचाकी वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे. प्रवाशांसाठी आरामदायी आसनव्यवस्था, सुरक्षितता उपकरणे, आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

New chapter in Konkan's water journey

मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण होणार असल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे. तसेच वाहनांसह प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्याने कुटुंबासोबत किंवा व्यवसायिक कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. New chapter in Konkan’s water journey

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNew chapter in Konkan's water journeyNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्या
Share49SendTweet31
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.