“वाजतंय छान” चा प्रिमियर शो मुंबईत रंगला
(उदय गणपत दणदणे, निवोशी यांच्याकडून साभार)
गुहागर, ता. 16 : कोकण टॉकीज या युट्यूब चॅनलनेच्या कार्यकर्त्यांनी कोकणातील नमन कलेचा गौरव (Naman Folk Art Gaurav Geet) करणारे एक गीत प्रसिध्द केलं आहे. या व्हिडिओचा प्रिमिअर शो मुंबईतील अंधेरी पूर्व येथे बाळ शिक्षण संस्था, गुंदवळी गावठाण मध्ये पार पडला. शहरातील, नव्या पीढीपर्यंत नमन कला पोचण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल. असे निर्माते राकेश जिमन यांनी सांगितले.


Naman Folk Art Gaurav Geet
नमन लोककलेची ओळख सर्वदूर होण्यासाठी या लोककलेची महती सांगणारे, लोककलेचा गौरव वाढविणाऱ्या गीताची निर्मिती केली पाहिजे अशी संकल्पना कोकण टॉकीजचे राकेश जिमन यांना सुचली. त्यावर काम सुरु झाले. कोकण टॉकिजमधील गीतकार अमोल भातडे यांनी शब्दांची जुळणी करुन गाणं लिहीलं. त्याला संगीतही दिले. हे गीत गायक: प्रशांत मेस्त्री, तेजस कदम, संदीप कांबळे, गायिका : शिवन्या मांडवकर, तेजल पवार, प्रीती भोवड यांनी सादर केले आहे. लाईव्ह ऱ्हिदम : राजेश धनावडे, महेश लोखंडे बासरी :प्रदीप शिंदे ,सनई: दुर्गेश भोसले , हार्मोनियम/कीबोर्ड : संदेश आंबेकर या कलाकारांच्या वादनाने हे गीत बहरले आहे. अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप येथे गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. मिक्सिंग-मास्टरींग – श्री.अविनाश बाईत यांनी केले. सृष्टी मुळीक व रुपेश वीर यांनी गाण्याचे चित्रीकरण केले. पोस्टर आणि व्हिडीओ डिजाइनिंगचे कामही सृष्टी मुळीक यांनी केले. अशा सर्व टीमच्या योगदानातून कोकण टॉकीज प्रस्तुत आणि राकेश जिमन निर्मित “वाजतंय छान” या नमन गौरव गाणे तयार झाले. Naman Folk Art Gaurav Geet


तयार झालेल्या गाण्याचा प्रिमियर शो अंधेरीत पार पडला. कार्यक्रम स्थानी सर्वांच्या उपस्थित केक कापून आनंद सोहळा पार पडला. त्यानंतर लोककलावंत, साईश्रद्धा कलापथकाचे निर्माते, लेखक संदिप कानसे यांच्या शुभहस्ते गाणे प्रदर्शित करण्यात आले, या कार्यक्रमाला उदय दणदणे, दिपक कारकर, प्रकाश दुदम, सुभाष बांबरकर, अमित काताळे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपेश वीर यांनी केले. ज्या कलाकारांच्या प्रयत्नांतून या गौरव गिताने आकार घेतला त्या सर्वांचे निर्मात राकेश जिमन यांनी अभिनंदन केले. आभार मानले. Naman Folk Art Gaurav Geet
नमन लोककलेवर आधारीत गीत : वाजतंय छान (व्हिडिओ)