• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खासदार सुनील तटकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

by Mayuresh Patnakar
October 23, 2020
in Old News
16 0
0
kadam tatkare
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर :  रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमीपुजनाला आपणास निमंत्रण देत नाहीत. आपल्याला विश्‍वासात न घेता कार्यक्रम करतात. असे नमुद करत दापोली विधानसभा मतदासंघाचे आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे.
याबाबत आमदार योगेश कदम म्हणाले की, खासदार सुनील तटकरे हे सातत्याने माझ्या दापोली विधानसभा मतदारसंघात मला डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत आहेत. 12 ऑक्टोबर रोजी मला निमंत्रण न देता त्यांनी दापोली येथील पंचायत समिती सभागृहात शासकीय अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली.  रायगड रत्नागिरी जिल्हे जोडणारा आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरून जड वाहने नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या पुलाच्या पुर्नंबांधणीसाठी आपण प्रयत्न केले. तर राज्यमंत्री आदिती तटकरे यांनीही संबंधित अधिकार्‍यांच्या या पुलासंदर्भात बैठका घेतल्या होत्या.
आंबेत पुलावरून जड वाहने नेण्यास परवानगी नसल्याने ही वाहने महाडमार्गे वळवली आहे. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागतो. म्हणून म्हाप्रळ ते आंबेत दरम्यान फेरी बोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूला फेरीबोट लावण्यासाठी जेटीचे बांधकाम करण्यासाठी  शासनाकडून निधीही मंजूर झाला आहे. या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्याअगोदरच खासदार सुनील तटकरे यांनी 11 ऑक्टोबर रोजी त्यांचे चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे व माजी आमदार संजय कदम यांना घेऊन या कामाचे भूमीपूजन केले. या कार्यक्रमाचे मला निमंत्रणही देण्यात आले नाही. तसेच या भूमीपुजनाच्या पाटीवर माझे नाव न टाकता खासदार महोदयांनी राष्ट्रवादी पक्षाचाच भूमीपूजन कार्यक्रम केला आहे.
ही बाब अतिशय गंभीर असून माझ्या हक्कावर गदा आणण्याचे काम सातत्याने खासदार सुनील तटकरे करत आहेत. त्यामुळे नाइलाजाने आपण 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.  खा. सुनील तटकरे यांच्यावर पुढील योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे. अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

फ्लॅशबॅक
12 ऑक्टोबर रोजी दापोली पंचायत समितीत येथे आढावा बैठकीसाठी आलेल्या खासदार सुनील तटकरे यांना पत्रकारांनी आमदार योगेश कदम या बैठकीला उपस्थित का नाहीत अशी विचारणा केली होती. त्यावेळी आमदार कदम पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या बैठकीला आले नसल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले होते. तसेच जिल्हा पातळीवर, स्थानिक पातळीवर तिन्ही राजकीय पक्षांमध्ये समन्वय होईल या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे. तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना तसेच पक्षाच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेत स्थानिक पातळीवर तसेच ग्रामपातळीवर काम कसे करायचे. हे येत्या काही दिवसात ठरविण्यात येईल अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी तेव्हा दिली होती. 

Tags: Breaking NewsferoboatGuhagarGuhagar NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsMLA Yogesh KadamMP Sunil TatkareNews in GuhagarTop newsआमदार योगेश कदमखासदार सुनील तटकरेगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्याफेरीबोटब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.