आमदार जाधव, परशुराम घाटाची केली पहाणी
गुहागर, ता. 10 : दरड कोसळेल म्हणून काम थांबवल्यास धोका अधिक वाढेल. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक काम तातडीने करावे. अशा सूचना आमदार भास्कर जाधव यांनी महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना केल्या. बुधवारी (ता. 9) सकाळी परशुराम घाटातील दुर्घटनाग्रस्त भागाची आमदार भास्कर जाधव यांनी पहाणी केली. MLA Jadhav inspected the affected area
मंगळवारी (ता. 8) मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये (Parshuram Ghat) रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना दरड (Landslide) कोसळली. या दरडीखाली दोन पोकलेन आणि एक पोकलेन चालक गाडले गेले. या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेवून येथील काम थांबविण्यात आले आहे. MLA Jadhav inspected the affected area
ही दुर्घटना घडली तेव्हा (मंगळवारी ता. 8) आमदार भास्कर जाधव यांचे व्याही (माजी नगरसेवक समीर जाधव यांच्या पत्नीचे वडील) दिलीपराव माने पाटील यांचे कोल्हापूरला निधन झाले. त्यामुळे आमदार जाधव तातडीने कोल्हापूरला गेले होते. तेथून आल्यावर बुधवारी (ता. 9) आमदार भास्कर जाधव यांनी परशुराम घाटातील (Parshuram Ghat) दुर्घटनाग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस, राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. MLA Jadhav inspected the affected area त्यावेळी सूचना करताना आमदार जाधव म्हणाले की, दुर्घटनेमुळे काम थांबवून ठेवल्यास धोका अधिक वाढू शकतो. वरच्या भागात परशुराम गाव (Parshuram villege) वसलेले आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून, काही संभाव्य धोका असल्यास त्याची त्यांना कल्पना देवून हे काम तात्काळ सुरू करावे. यावेळी श्री. फैसल कास्कर, श्री. मिलिंद कापडी हेसुध्दा उपस्थित होते. MLA Jadhav inspected the affected area