धोपावे ग्रामस्थ : निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळला
गुहागर, ता. 4 : मुलाबाळांना झोपवून पाण्यासाठी करावी लागणारी वणवण. दाभोळ व अन्य ठिकाणाहून विकतचे पाणी आण्यासाठी पाण्यासारखा खर्च होणारा पैसा. मुलांचे विवाह ठरविताना येणाऱ्या अडचणी. आजारी पडल्यास हंडाभर पाण्याची वानवा. हा संघर्ष संपणार आहे. आजपर्यंत निवडणुकीत फक्त आश्र्वासने मिळायची पण आमदार जाधव यांनी आमच्या डोक्यावर हंडा उतरण्याचा (water scarcity) शब्द पूर्ण केला. (MLA Jadhav fulfilled his election promise) असे सांगत धोपाव्याच्या महिलांनी अक्षरश: हात जोडून आमदार जाधव यांना धन्यवाद दिले. यावेळी महिलांना अश्रू अनावर झाले.
पाणी योजना मंजूर केल्याबद्दल आज धोपावेमध्ये आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार भास्कर जाधव आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव व्यवस्तेमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाहीत. मात्र आपले प्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत आणि विनायक मुळे यांना धोपावेत पाठवले होते. MLA Jadhav fulfilled his election promise
यावेळी मनोगत व्यक्त करताना परशुराम पालशेतकर म्हणाले की, 35 वर्ष आम्ही पाण्यासाठी संघर्ष करत होतो. लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र प्रत्येकवेळी केवळ आश्र्वासने मिळत होती. आमदार जाधव यांनी पाणी समस्या (water scarcity) संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 2019 च्या निवडणुकीत दिलेला शब्द खरा करुन दाखवला. गावाची पाण्याची वणवण थांबविणाऱ्या जाधव साहेबांच्या मागे आम्ही कायम राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. In every election, Political Parties has been promised for water. But, it was not completed. But MLA Jadhav fulfilled his election promise.
शिवशंकर पाटील व निवृत्ती गुढेकर म्हणाले, हा गाव भाजपचा (BJP) बालेकिल्ला होता. मात्र भाजपने वेळोवेळी आमची दिशाभूल केली गेली. आमदार जाधव यांच्या नेतृत्त्व आणि कर्तृत्वामुळे आम्ही शिवसेनेत (Shivsena) आलो. आमच्या महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम त्यांनी केल्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबतच कायम राहू. MLA Jadhav fulfilled his election promise
गावातील महिला प्रमिला गुढेकर, रंजना सुर्वे, चित्रा गुढेकर यांनीही आपले मन मोकळे केले. जाधव साहेबांनी गावासाठी पाणी योजना (New Water Scheme) मंजूर केली आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत पाण्यासाठी आश्वासने दिली जायची. पण, निवडणुकीनंतर पूर्ण होत नसत. परंतु आ. जाधव साहेबांनी आम्हांला दिलेला शब्द पूर्ण केला. असे सांगताना महिलांना अश्रु अनावर झाले होते. MLA Jadhav fulfilled his election promise
तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, गेली चाळीस वर्ष एकाच पक्षाकडून आश्वासने दिली जात होती. जो काम करेल, तोच आपला आमदार अशी ठाम भूमिका धोपावे ग्रामस्थांनी घेतली. आमदार जाधव यांना सर्वाधिक मतदान (Voting) याच गटातून झाले आहे. त्याची परतफेड म्हणून साहेबांनीही योजना मंजूर करून घेतली आहे. याच पद्धतीने विकासकामांसाठी जाधव साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहा. MLA Jadhav fulfilled his election promise
सभापती पूर्वी निमुणकर म्हणाल्या की, धोपावेवासीयांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सभापती म्हणून आमदार जाधव यांचे आभार. आता त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून ग्रामस्थांनी गावाचा सर्वांगिण विकास साधावा. MLA Jadhav fulfilled his election promise
जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळे म्हणाले की, या विधानसभा मतदारसंघात गेल्या 40 वर्षात जी कामे झाली नाहीत, ती कामे आमदार भास्कर जाधव यांनी अडुर, पालशेत येथील पाणी योजनेप्रमाणे धोपावे गावाची पाणी योजना मंजूर केली आहे. ही पाणी योजना यशस्वी होऊन प्रत्येक घराघरात पाणी पोहचेल. MLA Jadhav fulfilled his election promise
या कार्यक्रमात पाणी योजनेसाठी पाठपुरावा करणारे परशुराम पालशेतकर, शिवशंकर पाटील, निवृत्ती गुडेकर, अमोल निमकर, रोहिदास जाधव, सुधाकर नाटेकर, प्रमोद जाधव, मंगेश जाधव, संजय भोरजी, गजानन भोरजी, कृष्णा पालशेतकर, रोहिदास नाटेकर, अरविंद पाटील, मोहन गुडेकर, अनंत डावल, संदीप पवार, चंद्रकांत भुवड, निलेश जाधव, इस्माइल खान आदींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. MLA Jadhav fulfilled his election promise