• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकण महामंडळासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

by Mayuresh Patnakar
September 14, 2020
in Old News
17 1
0
Bhaskar Jadhav
34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आ. भास्कर जाधव यांना लेखी आश्वासन

गुहागर : कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे. यासाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या ठरावाचा राज्य सरकारकडून पाठपुरावा करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार भास्कर जाधव यांना दिले. दोन दिवसांच्या अधिवेशनात आम. जाधव यांनी याबाबत तारांकित प्रश्र्न विचारला होता.
महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात आल्यापासून कधीही कोकणच्या विकासासंदर्भात स्वतंत्र चर्चा झाली नव्हती. आमदार भास्कर जाधव यांनी २०१६च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा नियम २९३ च्या प्रस्तावाद्वारे कोकणच्या विकासावर विधानसभेत चर्चा घडवून आणली होती. या चर्चेतच कोकण वैधानिक विकास महामंडळ तयार करावे असा प्रस्ताव आम. जाधव यांनी दिला होता. त्यावर तत्कालिन मुख्यमंत्री आणि विदयमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अत्यंत सकारात्मक उत्तर देवून अनेक घोषणा केल्या. त्यामध्ये कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. असेही आश्वासन होते. केलेल्या घोषणांची कार्यवाहीदेखील सुरू झाली. वैधानिक विकास महामंडळासाठी विधानसभेत करण्यात आलेला ठराव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. त्यावर पत्रव्यवहारदेखील करण्यात आला. परंतु, तत्कालिन सरकारच्या प्रयत्नांना अपेक्षित यश आले नाही.
सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार जाधव यांनी हा विषयी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्र्न विचारला. मात्र अधिवेशन दोन दिवसांचे असल्याने आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्र्नांना सरकारतर्फे लेखी उत्तरे देण्यात आली. महामंडळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, कोकणाकरिता स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाचा मुद्दा सातत्याने सभागृहात मांडण्यात येतो. २०१६च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेवेळी या वैधानिक महामंडळाकरिता राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठपुरावा करेल. असे आश्वासन तत्कालिन मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. त्याअनुषंगाने त्यांनी दि. १७ सप्टेंबर २०१६ रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनाकडे विनंती केली आहे. तसेच त्यानंतर दि. २७ सप्टेंबर २०१८ व दि. ७ सप्टेंबर २०१९च्या पत्रान्वये कोकणसाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याकरिता सत्वर निर्णय घेण्याची विनंती केंद्र शासनास केली होती. कोकणाकरिता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याकरिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३७१ (२)(क) मध्ये सुधारणा करणे आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकारकडून आता पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल.

कोकणच्या विकासासाठी  संघर्ष सुरूच राहील: आ. जाधव
विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये आपण कोकणच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष करीत आलो आहे. मध्यंतरी काही काळ मला राज्य मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी कोकणातील विविध घटकांचे  वर्षानुवर्षे  प्रलंबित  प्रश्न सोडविण्याचा, त्यांच्यासाठी वेगवेगळया योजना आणण्याचा तसेच मोठया प्रमाणात निधी आणून रखडलेली मूलभूत विकासाची कामे करण्याचा प्रयत्न

Tags: Ajit PawarAjitdadaBhaskar JadhavDeputy CMGuhagarGuhagar NewsKokanKokan DevelopmentKonkan Statutory Development CorporationMarathi NewsNews in Guhagarshivsenaअजित पवारअजितदादाकोकणकोकण वैधानिक विकास महामंडळकोकणचा विकासटॉप न्युजताज्या बातम्याभास्कर जाधवमराठी बातम्यालोकल न्युजशिवसेना
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.