केंद्र सरकार व सक्त वसुली संचालनालय विभागाचा गुहागर राष्ट्रवादीने केला निषेध
गुहागर, दि. 28 : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांची अटक कारवाई चुकीची आहे. याबद्दल केंद्र सरकार व सक्त वसुली संचालनालय विभागाचा गुहागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहे. तसे तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन देण्यात आले आहे. Minister Malik’s arrest wrong

या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना केंद्र सरकारच्या दबावाने सक्तवसुली संचालनालय विभागाने काही सूचना व नोटीस न देता केवळ सूडबुद्धीने व आकसापोटी जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे. सदर अटकेची कारवाई ही पूर्णत चुकीच्या पद्धतीने झाली आहे. म्हणूनच या घटनेचा रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा व सक्त वसुली संचालनालय विभागाचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. Minister Malik’s arrest wrong
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र आरेकर, तालुका सचिव प्रदीप बेंडल, ओबीसी सेल रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, तालुका सह सचिव दिपक शिरधनकर, अंजनवेल गण प्रमुख अशोक बने, मयुरेश पवार आदी उपस्थित होते. Minister Malik’s arrest wrong

