आबलोली, चिखली, हेदवी, कोळवली व तळवळी प्रा.आरोग्य केंद्रात 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर कालावधीत रुग्णांची मोफत तपासणी व उपचार – डॉ.घनश्याम जांगीड
गुहागर, ता. 20 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुहागर तालुक्यामध्ये 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी तालुक्यातील 134491 इतकी लोकसंख्या निवडली असून या लोकसंख्येमध्ये 34918 इतक्या घरांमध्ये तपासणी केली जाणार आहे. Leprosy and tuberculosis search drive
यासाठी एकूण 121 इतक्या टीम तयार केल्या गेल्या आहेत. या टीममध्ये सुमारे 242 कर्मचारी व 24 पर्यवेक्षक काम करणार आहेत. आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक-सेविका अशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, प्रत्यक्ष जाऊन घरोघरी भेट देऊन संशयित क्षयरुग्णांची व कुष्ठरुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. निदान झाल्यास मोफत उपचार केला जाणार आहे. Leprosy and tuberculosis search drive
जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निश्चित केले असून समाजातील निदान न झालेले कुष्ठ व क्षय रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. लक्षणे असल्यास आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्याकडून मोहिमेदरम्यान जनतेने तपासणी करुन घ्यावी. गुहागर तालुक्यातील आबलोली, चिखली, हेदवी, कोळवली व तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. अशी माहिती आबलोली येथील पत्रकारांशी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगीड यांनी दिली. Leprosy and tuberculosis search drive
कुष्ठरोगाबाबतची लक्षणे
1. त्वचेवर फिकट अथवा लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, तेलकट, चकाकणारी त्वचा त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे
2. त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे
3. सतत हातापायात मुंग्या येणे
4. न बरी होणारी जखम असणे, क्वचित प्रसंगी हातातून वस्तू गळून पडणे किवा चालतांना पायातून चप्पल गळून पडणे
क्षयरोगाची प्रमुख लक्षणे
1. दोन आठवडे व त्यापेक्षा जास्त काळाचा खोकला
2. संध्याकाळी येणारा ताप
3. भूक न लागणे, वजन घटणे
4. थुंकीतून रक्त पडणे, धाप लागणे आदी लक्षणे फुप्फुसाच्या क्षयरोगामध्ये आढळतात
5. फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगामध्ये मानेवर गाठी, लसिकाग्रंथीना सूज येणे, पोटात दुखणे, अपचन, शौचाला त्रास होणे.
6. सांध्यांना सूज येणे, मणक्यांमध्ये दुखणे, वंध्यत्व आदी लक्षणे आढळतात.
तरी रुग्णांनी केंद्र शासनाच्या मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवीका व पुरुष स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी यांना जनतेने सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगीड केले आहे. Leprosy and tuberculosis search drive