ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवली येथे गेले काही दिवस बिबट्याचा (Leopard) भरवस्तीतील वावर वाढला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. leopard’s wawar in Talwali
मोठया प्रमाणात होत असलेली जंगलतोड, वाढती उष्णता, पाण्याचे कमी प्रमाण यामुळे सध्या जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीकडे आपला वावर वाढवल्याचे दिसून येत आहे. गेले काही दिवस तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा (Leopard) वावर वाढत चालला आहे. महिनाभरापूर्वी तळवली येथील शेतकरी उमेश जोशी व प्रकाश जोशी यांच्या वासरांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. यानंतर प्रकाश जोशी यांच्या वासरावर हल्ला केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा देखील केला होता. मात्र अद्यापही येथील बिबट्याचा वावर कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. leopard’s wawar in Talwali
याकडे वनविभागाने वेळीच लक्ष देऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी तळवली ग्रामस्थांमधून होत आहे. leopard’s wawar in Talwali