संतोष पावरी, पतसंस्थेची वर्धिष्णू वाटचाल
गुहागर, ता. 19 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर १८ लाख २९ हजाराचा नफा प्राप्त केला आहे. अवघ्या 40 महिन्याच्या कालावधीत संस्थेला ‘अ’ वर्ग प्राप्त झाला. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. सभासदांकडून कर्जहप्तांची नियमित होणारी परत फेड, संस्थेची वाढणारी गुंतवणूक व वाढणारी सभासद संख्या लक्षात घेता पतसंस्थेने विश्र्वासार्हता जपली आहे. अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली. Kharvi Patsanstha has 18 lakh 29 thousand net profit

संतोष पावरी म्हणाले की, खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची मार्च २०२२ अखेर सभासद संख्या ३९४७ आहे. ५ कोटी ६२ लाखाच्या ठेवी आहेत. ४ कोटी ४० लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. २ कोटी ४६ लाखाची गुंतवणूक पतसंस्थेने केली आहे. ७ कोटी १६ लाखांचे खेळते भांडवल आणि १ कोटी १२ लाख स्वनिधी संस्थेकडे आहे. ६१.१४% सी.डी.रेशो, ९५.०६% वसुली. १००% सोनेतारण कर्ज वसुली अशी मार्च 2022 अखेर संस्थेची आर्थिक स्थिती आहे. जिल्हा कार्यक्षेत्र असतानाही १ शाखा व १ सेवाकेंद्राच्या आधारावर पतसंस्थेने सलग ४ वर्षे ‘अ’ वर्ग प्राप्त केला. तर शासनाच्या आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पतसंस्थेने नफा कमावला आहे. म्हणूनच स्थापनेपासून सभासदांना शेअर्सच्या रकमेवर लाभांश दिला जात आहे. Kharvi Patsanstha has 18 lakh 29 thousand net profit

संस्थेची स्थापना होवून अवघा ४० महिन्याच्या कालावधी लोटला आहे. यामधील २०महिन्याचा कालावधी कोरोना महामारीने ग्रासलेला होता. दिर्घकालीन लॉकडाऊनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही ग्राहकांना नियोजनबद्ध ,नम्र व जलद सेवा देत शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे कामकाज करण्यात संस्था यशस्वी झाली. अल्पावधीतच संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम झाला. Kharvi Patsanstha has 18 lakh 29 thousand net profit
संस्था ठेवीदारांना गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक स्पर्धेच्या युगात अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान खारवी सामाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने पेलले. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत पतसंस्थेची वर्धिष्णू वाटचाल सुरु आहे. Kharvi Patsanstha has 18 lakh 29 thousand net profit
संस्थेच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे १३ संचालक, ५ कर्मचारी जिल्हा समन्वय समिती मंडळ व १ तज्ञ संचालक या सर्वांच्या परिश्रमामुळे हे यश अल्पकालावधीत संस्थेने मिळविले आहे. Kharvi Patsanstha has 18 lakh 29 thousand net profit
