गुहागर : महाराष्ट्र शासनाचे कॉप्स विद्यार्थी संघटना व इतर सामाजिक संस्था आयोजित CARE OF PUBLIC SAFETY ASSOCIATION राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा , २०२१ चे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते.यात खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.तनुजा प्रकाश पवार हिला राज्यस्तरिय वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला.
महिला शारीरिक व मानसीक दृष्ट्या सक्षम कशा बनु शकतात ? या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२१ मध्ये सहभागी होऊन तिने उत्तम विषय सादर केला.त्याबद्दल तिला प्रमाणपत्र देण्यात येऊन गौरविण्यात आले . आदम बेग संस्थापक, अध्यक्ष केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन ( कॉप्स ) अमर जालिंदर एकाड अध्यक्ष कॉप्स विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य हे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धांमध्ये या पूर्वी तिने कथाकथन, वक्तृत्व मध्ये भरघोष यश संपादन केले आहे.तिला मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डाँ. बाळासाहेब लबडे यांनी केले.तिच्या या यशाबद्दल गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.महेशजी भोसले व संचालक मंडळ, तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाँ अनिल सावंत, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.