गुहागर, ता. 20 : येथील हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ गुहागर यांच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी जाखडी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन ज्ञानेश्वर कलापथक कीर्तन वाडी यांचे जाखडी नृत्य हा कार्यक्रम व्याडेश्वर पार्किंग गुहागर येथे सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. Jakhadi dance organized at Guhagar

हनुमान देवस्थान फंड गुहागर बाजारपेठ हे दरवर्षी दिवाळी सणानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. यावर्षी कलागुणांना वाव मिळावा म्हणून गुहागर शहरातील कीर्तन वाडी येथील ज्ञानेश्वर कलापथक शाहीर सुयोग पानकर यांच्या जाकडी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आव्हान हनुमान देवस्थान फंड गुहागर बाजारपेठ यांच्यावतीने करण्यात आले आहे. Jakhadi dance organized at Guhagar