रत्नागिरी, ता. 02 : आविष्कार प्रकल्प लेखन स्पर्धेत विद्यापीठ विभाग प्रवर्गामध्ये सर्वसाधारण विजेतेपद रत्नागिरीच्या उपपरिसराला मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आविष्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. रत्नागिरीचे एकूण चार प्रकल्पांची निवड आविष्कारच्या अंतिम फेरीसाठी झाली होती. त्यात मानवता भाष आणि ललित कला प्रकारात सृष्टी तावडे या विद्यार्थ्यांनीला पाचवा क्रमांक मिळाला होता. समाजकार्य विभागाच्या प्रा. पूनम गायकवाड या तिच्या मेंटर होत्या. उर्वरित तीन प्रकल्प हे अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. Invention Writing Competition

आविष्कार स्पर्धेत चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराने अविष्कार झोनल स्तर स्पर्धेत पद्वव्युत्तर विभागात 12 प्रकल्पांमध्ये सहभाग नोंदवला. त्यातील 4 प्रकल्पांची निवड अंतिम फेरीसाठी झालीय. यामध्ये पद्धव्युत्तर शुद्ध विज्ञान प्रकारात 2 प्रकल्प अंतिम फेरीसाठी पात्र झाले तर मानवता भाष आणि ललित कला प्रकारात एका आणि कृषी आणि पशुसंवर्धन प्रकारात देखील आविष्कारच्या अंतिम फेरीसाठी निवडला गेला होता. Invention Writing Competition
संशोधनवृत्तीला चालना मिळावी. नवनिर्माणाचे स्वप्न विद्यार्थ्यांच्यात पेरण्याबरोबरच त्यांच्यातील क्षमता विकसित व्हावी, याकरिता मुंबई विद्यापीठ दरवर्षी ‘अविष्कार’ स्पर्धेचे आयोजन करत असते. यामध्ये विविध क्षेत्रांच्या विषयावरील प्रकल्प प्रस्ताव तयार करून त्याचे सादरीकरण करावयाचे असतात. या स्पर्धेत पदवी पदव्युत्तर स्नातक प्रवर्गामध्ये अभ्यासू, संशोधक विद्यार्थी सहभागी होतात. संशोधनपर असलेले प्रकल्प, विषय व त्याचे सादरीकरण या आणि अशा अनेकविध संदर्भाने त्यातील संशोधन मूल्याच्या निकषातून स्पर्धेत अंतिम टप्यापर्यंत जाता येते. Invention Writing Competition
या प्रकल्पांसाठी रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर, सहाय्यक कुलसचिव श्री अभिनंदन बोरगावे, सिंधुदुर्ग उपपरिसराचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग यांचे मार्गदर्शन लाभले. तर रत्नागिरी उपपरिसराचे डॉ पांडूरंग पाटील, श्रीमती तौफिन पठाण, प्रा. पूनम गायकवाड, प्रा अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे, प्रा. विजय गुरव, प्रा. सोनाली मेस्त्री आणि डॉ सतिश मांजरे यांनी यासाठी विशेष मेहतन घेतली. उपपरिसराच्या या घवघवित यशाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर, प्र कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणीक यांनी उपरिसराचे प्राध्यापक, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. Invention Writing Competition
