Indian Army inducts AERV
आज बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप (Bombay Engineering Group – BEG) पुणे येथे आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल (Armoured Engineer Reconnaissance Vehicle i.e. AERV) या विकसित अद्ययावत अभियांत्रिकी वाहनाचा पहिला संच भारतीय लष्कराच्या अभियंता तुकडीत दाखल करण्यात आला. या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे (Indian Army Chief General Manoj Mukund Naravane) उपस्थितीत होते. त्यांनी आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकलच्या (AERV) प्रदर्शनीय संचलनाला हिरवा झेंडा दाखवला. ही वाहने पूर्णपणे स्वदेशी बनावटीची, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन बनविण्यात आली आहेत. (Indian Army inducts AERV)
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) द्वारे या आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल (AERV) प्रणालीची रचना केली गेली आहे. मेडक आयुध निर्मिती कारखाना आणि पुण्याच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने त्याची निर्मिती केली आहे.
AERV चे महत्त्व
अनेकवेळा सीमावर्ती भागात शत्रुकडून भुसुरुंग पेरुन ठेवलेले असतात. छोट्या नदीपात्राच्या तळाशीही असे सुरुंग लपवले जातात. किंवा रस्ता असल्याचा आभास तयार केला जातो. अशी धोकादायक ठिकाणे ओळखता यावीत, अचुक सर्वेक्षण करता येईल असे हे तंत्रज्ञान आहे. त्याचप्रमाणे सैन्याला अनेकवेळा तातडीने रस्ते बनविण्याची आवश्यकत असते. कमीत कमी वेळात आणि कमीत कमी कष्टात सदरचा रस्ता बनविणे सुलभ जावे असे तंत्रज्ञान बसविलेले हे वाहन आहे. (Indian Army inducts AERV)
हे वाहन भुदल सर्वेक्षणांसाठी अभियंता कार्ये पार पाडण्यासाठी आणि फोर्स कमांडर्सना भुदलावरील त्यावेळच्या सद्यस्थितीची अचूक देणारी आहेत. त्याचबरोबर पाण्यातील अडथळे आणि दलदलीचे भाग शोधून काढण्यास सक्षम आहेत.
कार्यक्रमाचे वेळी बोलताना लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले की, आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल प्रणाली भारतीय सैन्याच्या विद्यमान अभियंता सर्वेक्षण क्षमता वाढवेल. भविष्यातील संघर्षांमध्ये यांत्रिक कार्यान्वयनाच्या समर्थनासाठी एक प्रमुख गेम चेंजर व्हेईकल असेल. विशेषत: पश्चिम क्षेत्रातील सीमांवर ही प्रणाली सर्वाधिक उपयोगी ठरेल. ( Indian Army inducts AERV )
या कार्यक्रमानंतर लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसीत केलेल्या सीबीआरएन जलशुध्दीकरण सयंत्राची (CBRN Water Purification System) पहाणी केली. या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील रासायनिक, जैविक, किरणोत्ससारी आणि अणुयुक्त घटक बाजुला काढून शुध्द पाणी मिळते.तसेच हे सयंत्र एका वाहनामध्ये बसेल अशापध्दतीने तयार केलेले असल्याने आणिबाणीच्या काळात सैन्यदलाला आवश्यक तेथे हे यंत्र नेले जावू शकते.