आमदार भास्कर जाधव उपस्थित राहणार
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील तळवली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन इमारत बांधण्यात आली आहे.- या आरोग्यवर्धिनी इमारतीचे उद्घाटन रविवार दि. 20/02/2022 रोजी दुपारी 3.00 वाजता करण्यात येणार आहे. हा उद्घाटन सोहळा पालकमंत्री अँड. अनिल परब, खासदार सुनिल तटकरे, आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थिती होणार आहे. Inauguration of health center in Talvali


तळवली आरोग्यवर्धिनी इमारतीचे उद्घाटनाला रामास्वामी एन्.(आयुक्त तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान), डाँ.व्ही.एन्.पाटील (जिल्हाधिकारी, रत्नागिरी),डाँ. इंदूराणी जाखड (मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.रत्नागिरी), उदय बने (उपाध्यक्ष तथा सभापती बांधकाम व आरोग्य जि.प.रत्नागिरी), दिपाली भाईक (अधिक्षक अभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान), डाँ. दुर्गादास शा. पांडे (उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर),सौ. पूर्वी निमूणकर (सभापती, पंचायत समिती गुहागर), डाँ.अनिरूद्ध आठल्ये (जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.रत्नागिरी), विभावरी विनायक मुळे (मा.सभापती, पंचायत समिती गुहागर), सिताराम ठोंबरे (उपसभापती, पंचायत समिती गुहागर), अमर सोनवणे (कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय आरोग्य अभियान), अमोल भोसले (गट विकास अधिकारी, पंचायत समिती गुहागर), प्रियंका पानसरे (उपअभियंता, रा.आ.अ.जि.प.रत्नागिरी),डाँ. घनश्याम जांगीड (तालूका आरोग्य अभियान गुहागर), मयुरी शिगवण (सरपंच ग्रा.पं.तळवली), अनंत डावल (उपसरपंच ग्रा.पं.तळवली),डाँ. पंकज देशमुख (वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र तळवळी), डाँ. मयुरी देसाई (वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र तळवळी), अमित हांडे, वास्तूविशारद (ओरीजिन असोसिएट, पुणे), अभिजीत शशिकांत जाधव (कंत्राटदार, चिपळूण) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळवळी अंतर्गत सरपंच, उपसरपंच, सर्व रूग्णकल्याण समिती सदस्य आदी उपस्थिती राहणार आहेत. तरी या उदघाटन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन तळवली आरोग्यकेंद्राच्या रुग्ण कल्याण कमिटी व वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे. Inauguration of health center in Talvali