• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला

by Ganesh Dhanawade
January 6, 2021
in Old News
16 1
2
अखेर मोडकाआगर रस्ता वहातुकीस खुला
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : मोडकाआगर पुलाजवळ राहीलेला भराव टाकून आज ठेकेदाराने गुहागर शृंगारतळी रस्ता वहातुकीसाठी खुला केला आहे. खातू मसाले पासून पाटपन्हाळे पर्यंत एका बाजुचे क्राँक्रिटीकरणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता  दुचाकी आणि चारचाकी हलकी वाहने या रस्त्यावरुन ये जा करुन शकतात. मात्र एस.टी., ट्रक यासारख्या अवजड वाहनांना या मार्गाने वाहतूक करण्यास बंदी आहे. गंमतीचा भाग म्हणजे आजही अवजड वाहनांना बंदी घालताना जुना पूल कमकुवत असल्याचे कारण पुढे केले जात आहे.
एप्रिल 2020 मध्ये मोडकाआगर धरणात नव्या पुलाचे काम सुरु झाले. तेव्हापासून डिसेंबर 2020 पर्यंत 7 महिने गुहागर शृंगारतळी राष्ट्रीय महामार्ग वहातूकीस बंद होता. आजही नव्या पुलाच्या कामाला सुरवात झालेली नाही.  19 नोव्हेंबरला आमदार भास्कर जाधव यांनी पुलाबाबत ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांकडे मोडकाआगर रस्ता कधी सुरु करणार अशी विचारणा पाटपन्हाळे येथील सभेत केली. त्यावेळी दोन महिन्यात मातीचा भराव टाकून रस्ता सुरु करु असे आश्र्वासन ठेकेदाराने दिले होते. ते आश्र्वासन ठेकेदाराने पूर्ण केले आहे. नव्या पुलाजवळचा भराव टाकलेला रस्ता अरुंद असल्याने व संरक्षक कठडा नसल्याने एकावेळी एकच वाहन पुलाजवळील मार्गाने जाऊ शकते.
मोडकाआगर पुलापलीकडे ठेकेदाराने गतीने कामाला सुरवात केली आहे. मोडकाआगरच्या जुन्या पुलापासून शृंगारतळीत पूर्वी गॅरेज होते तेथील पुलापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकर पूर्ण झाले आहे. या मार्गावर एक मोठा पुल आणि दोन मोऱ्यांची कामेही वेगाने सुरु आहेत.  भराव टाकून खातू मसाले उद्योगपासून पाटपन्हाळेपर्यंत एका बाजुचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. हा वेग पहाता पुढील महिनाभरात मोडकाआगर ते शृंगारतळी गॅरेजजवळी पुलापर्यंतचे क्राँक्रिटीकरण पूर्ण होईल असा अंदाज आहे.
अजुनही नव्या पुलाच्या कामाला सुरवात झालेली नाही. येथील पाण्याची पातळी अजुनही कमी झालेली नाही. कदाचित दुसऱ्या बाजुला पुन्हा भराव टाकून नव्या पुलाजवळील पाणी काढून ठेकेदार या महिन्यात पुलाच्या कामाला सुरवात करेल.
जुना पुल आजही कमकुवत
नव्या पुलाजवळून एकेरी वहातूक सुरु करताना ठेकेदाराने लावलेल्या फलकांवर जुन्या पुलाचा उल्लेख कमकुवत पुल म्हणून केला आहे. तीन वर्षांपूर्वी हा पुल कमकुवत असल्याचा अहवाला तयार झाला. तेव्हापासून एस.टी.सह अवजड वाहनांना पुलावरुन वहातूक करण्यास बंदी घालण्यात आली. तरीदेखील काही काळानंतर या पुलावरुन अनधिकृतपणे सर्व प्रकारची वहातूक सुरु होती. आजदेखील नव्या पुलाजवळ रस्ता तयार करण्यासाठी टाकला जाणार भरावाच्या मातीची वहातूक ठेकेदाराने डंपरमधुनच केली. नव्या पुलाच्या कामासाठी क्रेन, स्टील, सिमेंट आदी वहातूकही ठेकेदार जुन्या पुलावरुनच करत होता. तरीदेखील कमकुवत पुल असा उल्लेख का करण्यात येत आहे याचे अनेकांना कोडे पडले आहे.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.