गुहागर : नेहमीच काहीना काही उपक्रमांमध्ये मग्न असणार्या गुहागर प्रतिष्ठान ने सध्याच्या पावसाचा अंदाज घेऊन या पावसात उभे राहून महामार्गावर काम करणाऱ्या पोलिसांना शृंगारतळी येथे छत्री वाटप केले.
गुहागर प्रतिष्ठान हे मुंबई ,विरार, नालासोपारा, वसई ते गुहागर पर्यंत अनेक उपक्रम राबवित असतात. तालुक्यातील सर्व युवकांना एकत्र घेऊन त्यांचे काम चालू आहे यामध्ये शैक्षणिक असो आरोग्य विषयी असो क्रीडाविषयक असो आपले उपक्रम सतत चालू असतात. कोरोना काळतही यांनी अनेक ठिकाणी योद्ध्यांचे काम केले तर काही शाळांना मदत केली कोरना सेंटर या ठिकाणी लागणार्या उपयुक्त वस्तू म्हणजेच सॅनिटायझर मार्क्स वाटप केले .रक्तदान शिबिरे घेतली याचप्रमाणे आता छत्री वाटप केली. यामध्ये गुहागर पोलिस स्टेशन मधील शृंगारतळी येथे कार्यरत असणारे पोलीस ,होमगार्ड तसेच काही पत्रकार यांना छत्रीचे वाटप केले. गुहागर प्रतिष्ठानने शून्यातून सुरुवात करून आभाळ झेप घेतली आहे. सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा होत आहे .ना राजकारण ना करता फक्त समाजकारण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. यामध्ये अध्यक्ष योगेश कदम ,सुनील हल्ये,अंकुश मूकनाक ,गणेश हळ्ये,नीलेश धनावडे, संतोष पारदळे ,प्रभाकर नितोरे ,वैभव हळये, रविंद्र साळवी, मनोज गावडे ,विनायक चव्हाण, भरत गुजर, नरेश जाधव यांच्या सह अनेक कार्यकर्ते हे उपक्रम राबवित असतात.