गुहागर : चिखली बौध्दवाडीत पोफळीवरील सुपारी काढताना लोखंडी पाईप विजवाहिनीला चिकटली. त्यामुळे विजेच्या धक्क्याने वसंत लक्ष्मण कानसे (वय 55) रा. चिखली मांडवकरवाडी यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची खबर संजय कृष्णा कानसे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार चिखली मांडवकर वाडी येते रहाणारे वसंत लक्ष्मण कानसे रंगकाम करतात. चिखली बौध्दवाडी प्रशांत दीक्षित यांच्या घराचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. रविवारी (ता. 20) वसंत कानसे प्रशांत दीक्षित यांच्या घरी रंगकामासाठी गेले होते. दुपारी १ वाजताचे दरम्यान ते लघुशंकेसाठी घराशेजारील बागेत गेले. तेथे लावलेल्या पोफळीवर त्यांना सुपारी दिसली. ती सुपारी काढण्यासाठी घराशेजारीच पडलेला लोखंडी पाईप त्यांनी घेतला. त्याला तेथीलच लोखंडी हुक लावला. आणि पोफळीवरील सुपारी काढण्याचा प्रयत्न वसंत कानसे करत होते. मात्र या बागेतून गेलेली विद्युत वाहिनी त्यांना दिसली नाही. दुर्दैवाने सुपारी काढताना पाईपला अडकवलेल्या हुकाचा स्पर्श वीज वाहिनीला झाला. विजेच्या धक्क्याने वसंत कानसे यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत नलावडे करत आहेत.