गुहागरचा निकाल 99.10 टक्के, गुणानुक्रमात मुलींची बाजी
गुहागर ता. 08 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षांचा निकाल (Guhagar HSC Result) जाहीर झाला. यात गुहागर तालुक्यातील 99.10 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तालुक्यातील 1112 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1102 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 72 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 510 विद्यार्थ्यांनी श्रेणी 1, 485 विद्यार्थ्यांनी श्रेणी 2 व 35 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी मिळवली.
तालुक्यातील प्रत्येक शाळेत विद्याशाखा निहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक जाहीर केले जातात. गुहागर न्यूजला प्राप्त झालेल्या शाळांतर्गत निकालात 45 क्रमांकांमध्ये 33 विद्यार्थीनीनी स्थान मिळविले आहे. त्यामधील टक्केवारीनुसार गुहागरमधील गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेत शिकणारी सानिका जयराज वेल्हाळ, रा. नरवण ही विद्यार्थीनी 86 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम आली आहे. तर आबलोली कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत शिकणारा आदित्य दत्ताराम गुरव (85.67 टक्के) तालुक्यात दुसरा आला आहे.
तालुक्याचा निकाल ( Guhagar HSC Result) पुढील प्रमाणे
Guhagar HSC Result गुहागर : 98.90 टक्के
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयातील 273 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 270 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेतून परिक्षेला बसलेले 113 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमाक : सानिका जयराज वेल्हाळ, नरवण (86 टक्के)
द्वितीय क्रमांक : ईशा अजित पवार, कारुळ (80 टक्के)
तृतीय क्रमांक : करण अनिल साळवी, अडूर (79.83 टक्के)
वाणिज्य शाखा : 119 विद्यार्थ्यांपैकी 117 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक : ऋतुजा राजेश भोसले, आरेगांव (78.17 टक्के)
द्वितीय क्रमांक : पूजा संजय घुमे, असगोली (77.67 टक्के)
प्रणित प्रमोद ढेरे, गुहागर (77.67 टक्के)
तृतीय क्रमांक : प्राजक्ता राजेंद्र साटले, गुहागर (77.33 टक्के)
कला शाखा : 41 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक : समृद्धी सुहास रामाणे, असगोली (79.83 टक्के)
द्वितीय क्रमांक : साक्षी संजय भेकरे, धोपावे (73.33 टक्के)
तृतीय क्रमांक : माधुरी संजय गोडे, गुहागर (71.17 टक्के)
Guhagar HSC Result पाटपन्हाळे हायस्कुल : 100 टक्के निकाल
न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे मधील सर्वच्या सर्व 328 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळविले.
कला शाखा
प्रथम क्रमांक : साहिल संतोष साळवी (62.17 टक्के)
द्वितीय क्रमांक : प्राची विजय खांबे (60.50 टक्के)
तृतीय क्रमांक : अमर अरविंद मोहिते (58.50 टक्के) व प्रिती प्रभाकर कावणकर (58.50 टक्के)
वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक : प्रणय सखाराम फटकरे (82.67 टक्के)
द्वितीय क्रमांक : वसुधा रतन भागडे (81.83 टक्के)
तृतीय क्रमांक : दिक्षा संदिप पवार (77.83 टक्के)
विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक : सिद्धी प्रविण संसारे (72.17 टक्के)
द्वितीय क्रमांक : सिद्धी संतोष घाणेकर (69.67 टक्के)
तृतीय क्रमांक : सिद्धी नारायण कुंभार (66.00 टक्के)
Guhagar HSC Result तळवली : 100 टक्के निकाल
न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवलीमधील बारावीच्या परीक्षेला बसलेले 71 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखा
प्रथम क्रमांक : प्रतिक्षा रामचंद्र मुरमुरे (69.67 टक्के)
द्वितीय क्रमांक : श्रुती संतोष गावणंग (68.67 टक्के)
तृतीय क्रमांक : ऋषिकेश उदय समगीसकर (68.33 टक्के)
वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक : मनिषा अनंत भातडे (81.33 टक्के)
द्वितीय क्रमांक : श्रुतिका रमेश डिंगणकर (79.50 टक्के)
तृतीय क्रमांक : संकेत गणेश कांबळे (78.50 टक्के)
Guhagar HSC Result आबलोली : 100 टक्के निकाल
चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील 106 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
कला शाखा
प्रथम क्रमांक : विवेक विलास आंबेकर (76.33 टक्के)
द्वितीय क्रमांक : अमित महेश पवार (75.17 टक्के)
तृतीय क्रमांक : विनायक सुधीर जाधव (74.83 टक्के)
वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक : आदित्य दत्ताराम गुरव (85.67 टक्के)
द्वितीय क्रमांक : प्रसाद महादेव अवेर (79.67 टक्के)
तृतीय क्रमांक : दिशा प्रदिप सुर्वे व किशोरी कृष्णा डिंगणकर (78.33 टक्के)
विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक : फातिमा झुबेर मुजावर (79.00 टक्के)
द्वितीय क्रमांक : यश महेंद्र रेडेकर (76.83 टक्के)
तृतीय क्रमांक : सिद्धी सदानंद कलये (75.67 टक्के)
Guhagar HSC Result पालशेत : 100 निकाल
श्रीमती रखमाबाई पांडुरंग पालशेतक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत मधील 4 विद्याशाखांमधून 181 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळविले.
कला शाखा
प्रथम क्रमांक : गायत्री दत्ताराम दणदणे (74.00 टक्के)
द्वितीय क्रमांक : प्राची शांताराम हुमणे (71.33 टक्के)
तृतीय क्रमांक : दिव्या रामचंद्र जाधव (66.33 टक्के)
वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक : सानिका अविनाश कुंभार (74.67 टक्के)
द्वितीय क्रमांक : महेंद्र उदय माटल (72.17 टक्के)
तृतीय क्रमांक : दिक्षा गजानन पालशेतकर (71.17 टक्के)
विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक : साक्षी सुनिल मोरे (67.83 टक्के)
द्वितीय क्रमांक : मृण्मयी अरविंद पटेकर (66.33 टक्के)
तृतीय क्रमांक : श्रुतिका दत्ताराम घुमे (65.5 टक्के)
एमसीव्हीसी (व्यावसायिक) शाखा
प्रथम क्रमांक : अर्थव दिनेश वराडकर (80.67 टक्के)
द्वितीय क्रमांक : रुचिका उमेश पोळेकर (72.33 टक्के)
तृतीय क्रमांक : सार्थकी संतोष ढोर्लेकर (71.33 टक्के)
याशिवाय अंजनवेल हायस्कुल 72 उत्तीर्ण (100 टक्के निकाल), शृंगारी उर्दु कनिष्ठ महाविद्यालयातील 42 पैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण (97.61 टक्के) असा निकाल लागला आहे.