रानवी येथे रंगला 16 संघांचा क्रिकेट महासंग्राम
गुहागर : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) संलग्न कुणबी युवा क्रीडा मंडळ मातृ संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त गुहागर तालुक्यातील रानवी येथील माळरानावर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम कुणबी प्रिमियर लिग गुहागर या भव्य दिव्य स्पर्धेचे उद्घाटन कुणबी समाजोन्नती संघ शाखा गुहागरचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे उर्फ गुरुजी, गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या हस्ते श्रीफळ व फित सोडून करण्यात आले. या स्पर्धेमध्ये समाजातील 16 संघ सहभागी झाले आहेत.
Kunbi Samajonnati Sangh Mumbai Branch Taluka Guhagar (Rural) Affiliated Kunbi Yuva Krida Mandal The grand opening of the cricket tournament Kunbi Premier League Guhagar, held at Malran in Ranvi in Guhagar taluka, was inaugurated by raising coconuts and cuting the ribbon. 16 members of the community have participated in this competition.
यावेळी कुणबी समाजोन्नती संघ गुहागर तालुक्याचे सरचिटणीस तुकाराम निवाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रदीप बेंडल, गुहागर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र भागडे, नगरसेविका प्रणिता साटले, स्नेहल रेवाळे, माजी उपनगराध्यक्ष स्नेहा भागडे, मनाली सांगळे, नगरसेवक माधव साटले, नगरपंचायत आरोग्य सभापती प्रसाद बोले, समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते माधवराव साटले, प्राथमिक शिक्षक मंडळाचे संचालक सुनील रामाणे, जनार्दन भागडे, गजानन धावडे, आनंद पागडे, पाचेरी आगर सरपंच दिपक भुवड, उद्योजक भालचंद्र जोगळे, वडद सरपंच संदीप धनावडे, दिनेश बारगुडे, रानवी पोलीस पाटील हेमंत शिगवण, सचिन आग्रे, विनोद चौगुले, रघुनाथ घाणेकर, तुकाराम दवंडे, संतोष मोरे, सुधीर टाणकर, वैभव आदवडे, सखाराम वेद्र, जीवनश्री प्रतिष्ठानचे संतोष वरंडे, कुणबी युवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष सोलकर, उपाध्यक्ष प्रमोद गोणबरे, अरुण भागडे, दिपेश ठोंबरे, विजय नाचरे, नितीन घरत, सरचिटणीस नितीन पागडे, सरचिटणीस सचिन मस्कर, खजिनदार रुतेश शिगवण, सहखजिनदार पंकज आग्रे आदींसह तालुक्यातील समाज संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेदरम्यान गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा कुणबी युवा क्रीडा मंडळाच्यावतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन बेंडल यांना शुभेच्छा दिल्या. पहिल्याच झालेल्या शुभारंभ सामन्यात ओंकार वरंडे याच्या ओंकार इंजिनिअरिंग वर्क संघाने उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर यश संपादन केले. पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांना उतुंग षटकार पहावयास मिळाले. स्पर्धेचे उत्तम नियोजन, उत्कृष्ट पंचगिरी आणि तेव्हढीच प्रेक्षकांची दाद मिळाली आहे.