• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ

by Ganesh Dhanawade
December 14, 2021
in Guhagar
19 0
0
कुणबी प्रिमियर लिग स्पर्धेचा शानदार शुभारंभ
37
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रानवी येथे रंगला 16 संघांचा क्रिकेट महासंग्राम

गुहागर : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) संलग्न कुणबी युवा क्रीडा मंडळ मातृ संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त गुहागर तालुक्यातील रानवी येथील माळरानावर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम कुणबी प्रिमियर लिग गुहागर या भव्य दिव्य स्पर्धेचे उद्घाटन कुणबी समाजोन्नती संघ शाखा गुहागरचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे उर्फ गुरुजी, गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या हस्ते श्रीफळ व फित सोडून करण्यात आले. या स्पर्धेमध्ये समाजातील 16 संघ सहभागी झाले आहेत.
Kunbi Samajonnati Sangh Mumbai Branch Taluka Guhagar (Rural) Affiliated Kunbi Yuva Krida Mandal The grand opening of the cricket tournament Kunbi Premier League Guhagar, held at Malran in Ranvi in ​​Guhagar taluka, was inaugurated by raising coconuts and cuting the ribbon. 16 members of the community have participated in this competition.

यावेळी कुणबी समाजोन्नती संघ गुहागर तालुक्याचे सरचिटणीस तुकाराम निवाते,  राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रदीप बेंडल, गुहागर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र भागडे, नगरसेविका प्रणिता साटले, स्नेहल रेवाळे, माजी उपनगराध्यक्ष स्नेहा भागडे, मनाली सांगळे, नगरसेवक माधव साटले, नगरपंचायत आरोग्य सभापती प्रसाद बोले, समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते माधवराव साटले, प्राथमिक शिक्षक मंडळाचे संचालक सुनील रामाणे, जनार्दन भागडे, गजानन धावडे, आनंद पागडे, पाचेरी आगर सरपंच दिपक भुवड, उद्योजक भालचंद्र जोगळे, वडद सरपंच संदीप धनावडे, दिनेश बारगुडे, रानवी पोलीस पाटील हेमंत शिगवण, सचिन आग्रे, विनोद चौगुले, रघुनाथ घाणेकर, तुकाराम दवंडे, संतोष मोरे, सुधीर टाणकर, वैभव आदवडे, सखाराम वेद्र, जीवनश्री प्रतिष्ठानचे संतोष वरंडे, कुणबी युवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष सोलकर, उपाध्यक्ष प्रमोद गोणबरे, अरुण भागडे, दिपेश ठोंबरे, विजय नाचरे, नितीन घरत, सरचिटणीस नितीन पागडे, सरचिटणीस सचिन मस्कर, खजिनदार रुतेश शिगवण, सहखजिनदार पंकज आग्रे आदींसह तालुक्यातील समाज संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेदरम्यान गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा कुणबी युवा क्रीडा मंडळाच्यावतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन बेंडल यांना शुभेच्छा दिल्या. पहिल्याच झालेल्या शुभारंभ सामन्यात ओंकार वरंडे याच्या ओंकार इंजिनिअरिंग वर्क संघाने उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर यश संपादन केले. पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांना उतुंग षटकार पहावयास मिळाले. स्पर्धेचे उत्तम नियोजन, उत्कृष्ट पंचगिरी आणि तेव्हढीच प्रेक्षकांची दाद मिळाली आहे.

Tags: communityCompetitioncricket tournamentGuhagarGuhagar NewsinaugurateKunbi Premier League GuhagarKunbi Samajonnati SanghKunbi Yuva Krida MandalMarathi NewsNews in GuhagarRuralकुणबी प्रिमियर लिगकुणबी युवा क्रीडा मंडळकुणबी समाजोन्नती संघ मुंबईक्रिकेटगुहागर शहर विकास आघाडीटॉप न्युजताज्या बातम्यानगराध्यक्ष राजेश बेंडलमराठी बातम्यामातृ संस्थाराष्ट्रवादी काँग्रेसलोकल न्युज
Share15SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.