• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यात २७३ ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम

by Ganesh Dhanawade
June 8, 2022
in Politics
17 0
0
Gram Panchayat Election

Gram Panchayat Election

34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 08 : पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. जिल्ह्यात २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकां होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी आता शहराबरोबरच ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली आहे. Gram Panchayat Election

जिल्ह्यातील तब्बल २७३ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ४ ते ६ जून दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करायचा आहे. यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ७ जूनला आरक्षण सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करायचे आहे. ७ ते १० जूनपर्यंत आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ग्रामस्थांना मुदत देण्यात आली आहे. १५ जूनला उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन त्यावर आपला अभिप्राय नोंदवायचा आहे. १७ तारखेला प्रांताधिकार्‍यांनी जाहीर केलेले अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेला जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. Gram Panchayat Election

जिल्ह्यातील मंडणगडमध्ये १६, दापोली ३४, खेड १७, गुहागर २६, चिपळूण ३३, संगमेश्वर ३९, रत्नागिरी ३३, लांजा ३४ व राजापूर ४१ या तालुक्यात ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत होणार आहे. राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे. Gram Panchayat Election

Tags: Gram Panchayat ElectionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNagarpalikaNews in GuhagarPanchayat SamitZilla Parishadटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्या
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.