दुर्गंधीने वाहनचालक त्रस्त, स्थानिक प्रशासन सुस्त
गुहागर, ता. 26 : चिपळूण-गुहागर मार्गावरील देवघर ते गिमवी दरम्यान, रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेत्यांनी डंम्पींग ग्राऊंड केल्याचे दिसून येत आहे. टाकाऊ, सडलेला भाजीपाला येथे आणून टाकला जात असल्याने या परिसरात मोठी दुर्गंधी सुटल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एवढया मोठ्या प्रमाणात येथे कचरा टाकला जात असताना स्थानिक प्रशासन सुस्त कसे काय असा सवाल उपस्थित होत आहे. Gimvi-Deoghar Dumping Ground

गिमवी-देवघर मार्गावर रस्त्याच्याकडेला हा टाकाऊ, खराब झालेला भाजीपाला आणून टाकला जात आहे. विशेष करुन या मार्गावरुन आठवडा बाजाराला येणारे भाजी व्यापारी, विक्रेते आपला खराब भाजीमाल या ठिकाणी टाकत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दर गुरुवारी गुहागर येथे तर शृंगारतळी येथे आठवडा बाजार भरतो. हा बाजार संध्याकाळी उशिरापर्यंत असतो. भाजीविक्रेत्यांची आवराआवर होईपर्यंत रात्र होते त्यामुळे परतीच्या प्रवासात या मार्गावरुन जाताना अंधाराचा गैरफायदा घेत येथे टाकाऊ भाजी टाकली जात असल्याची शक्यता आहे. Gimvi-Deoghar Dumping Ground
अलिकडे भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. असे असताना ग्राहकांनी चढ्या दराने भाजी विकणाऱ्या विक्रेत्यांचा माल असा खराब होऊनतो टाकून दिला जात असेल तर तो कमी भावात का विकला जात नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे. टाकण्यात येत असलेल्या टाकाऊ भाजीत टोमँटो, तोंडली, फ्लाँवर यांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. तसेच कुजका पालाही यामध्ये आहे. मात्र, महामार्गाच्या कडेलाच तो टाकला जात असल्याने जणू काही येथे डम्पिंग ग्रांऊडच असल्याचे दिसून येत असून वाहनचालकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. Gimvi-Deoghar Dumping Ground