शेकडो पुरग्रस्तांनी घेतला मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील प्रिन्स चित्रेश व नेनेस्का खेडकर हॉस्पीटल मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण येमे व स्त्री रोग तज्ञ डॉ. पुजा येमे, आरोग्य सेविका ऐश्वर्या नरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण मधील पुरग्रस्तांसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पुरग्रस्तांना आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार करण्यात आले.
Medical officers from Prince Chitresh and Neneska Khedkar Hospital, Dr. Laxman Yeme and gynecologist Dr. A free screening camp for flood victims in Chiplun was organized under the guidance of Puja Yeme, Health Worker Aishwarya Narvankar. At that time, the flood victims were given free medical treatment as required.
सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी अंजनवेल मधील सामाजिक कार्यकर्ते सरफराज महालदार, तोशीफ वालापकर, इरशाद महालदार, परवेझ कोंडेकर, लियाकत वावेकर व स्थानिक स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. अनेक वस्त्यांमध्ये चिखल तुडवतच या टीमने वैद्यकीय सेवा दिली. सतत पाणी व चिखलात असल्यामुळे पुरग्रस्तांच्या पायाला लावण्यासाठी सोफ्रामायसीनचे, महिलां व मुलींसाठी सॅनीटरी नॅपकीनचे वाटपही या मोफत आरोग्य तपासणी शिबीरा दरम्यान करण्यात आले. पुरग्रस्तांना विविध आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यादृष्टीने वैद्यकीय मदतकार्य करणे अत्यावश्यक होते. सदर शिबीराच्या माध्यमातून पुरग्रस्तांची आरोग्य सेवा करून मदतकार्यात सहभागी होता आल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण येमे व डॉ. पुजा येमे व टीमने समाधान व्यक्त केले. युसुफ मेहेरअली सेंटर अश्या प्रकारची वैद्यकीय सेवा देण्यासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे युसुफ मेहेरअली सेंटरचे सहसचिव मधु मोहिते यांनी सांगितले. सदर मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये शेकडो रूग्णांनी तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेतला.