• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

युसुफ मेहेरअली सेंटरतर्फे पुरग्रस्तासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

by Ganesh Dhanawade
August 5, 2021
in Old News
16 0
0
युसुफ मेहेरअली सेंटरतर्फे पुरग्रस्तासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शेकडो पुरग्रस्तांनी घेतला मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील प्रिन्स चित्रेश व नेनेस्का खेडकर हॉस्पीटल मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण येमे व स्त्री रोग तज्ञ डॉ. पुजा येमे, आरोग्य सेविका ऐश्वर्या नरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण मधील पुरग्रस्तांसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पुरग्रस्तांना आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार करण्यात आले.
Medical officers from Prince Chitresh and Neneska Khedkar Hospital, Dr. Laxman Yeme and gynecologist Dr. A free screening camp for flood victims in Chiplun was organized under the guidance of Puja Yeme, Health Worker Aishwarya Narvankar. At that time, the flood victims were given free medical treatment as required.
सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी अंजनवेल मधील सामाजिक कार्यकर्ते सरफराज महालदार, तोशीफ वालापकर, इरशाद महालदार, परवेझ कोंडेकर, लियाकत वावेकर व स्थानिक स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. अनेक वस्त्यांमध्ये चिखल तुडवतच या टीमने वैद्यकीय सेवा दिली. सतत पाणी व चिखलात असल्यामुळे पुरग्रस्तांच्या पायाला लावण्यासाठी सोफ्रामायसीनचे, महिलां व मुलींसाठी सॅनीटरी नॅपकीनचे वाटपही या मोफत आरोग्य तपासणी शिबीरा दरम्यान करण्यात आले. पुरग्रस्तांना विविध आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यादृष्टीने वैद्यकीय मदतकार्य करणे अत्यावश्यक होते. सदर शिबीराच्या माध्यमातून पुरग्रस्तांची आरोग्य सेवा करून मदतकार्यात सहभागी होता आल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी  डॉ. लक्ष्मण येमे व डॉ. पुजा येमे व टीमने  समाधान व्यक्त केले. युसुफ मेहेरअली सेंटर अश्या प्रकारची वैद्यकीय सेवा देण्यासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे युसुफ मेहेरअली सेंटरचे सहसचिव मधु मोहिते यांनी सांगितले. सदर मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये शेकडो रूग्णांनी तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेतला.

Tags: Campflood victimsGuhagarGuhagar NewsgynecologistMarathi NewsMedical officersmedical treatmentNeneska Khedkar HospitalNews in GuhagarorganizepatientsPrince Chitresh and Neneska Khedkar Hospitalआरोग्य तपासणीआरोग्य तपासणी शिबिरटॉप न्युजताज्या बातम्यापुरग्रस्तप्रिन्स चित्रेश व नेनेस्का खेडकर हॉस्पीटलमराठी बातम्यायुसुफ मेहेरअली सेंटरलोकल न्युजवैद्यकीय सेवा
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.