Food donation by Guhagar MNS
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने श्री समर्थ अन्न छत्राचे (Food donation by Guhagar MNS) आज गुरुवारी शृंगारतळी येथे आयोजन करण्यात आले होते.
अन्न छात्र महाराष्ट्र सैनिक प्रियांका मिरगावकर दी रॉक फिटनेस अँड वि. ए. आर टी. च्या सौजन्याने या अन्नदान छत्राचे आयोजन करण्यात आले होते. या अन्नदान छत्राचा अनेक नागरिकानी लाभ घेतला. या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शृंगारतळी व्यापारी फुल मार्केटचे अध्यक्ष सुभाष राजपूत व व्यापारी संघटना अध्यक्ष अजित बेलवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. (Food donation by Guhagar MNS)
यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, कोतळुक शाखा अध्यक्ष दिनेश निवाते, स्वप्निल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य वैभवी विनोद जानवळकर, बबलू शिकै, राम देवळेकर, कमलाकर वनगे, सुदेश पाते, वसंत जानवळकर, महेंद्र आयरे उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले. (Food donation by Guhagar MNS)