नेत्रा ठाकुर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गुहागर : जिल्ह्यातील मच्छिमार समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून त्यांच्या उपजिविकेचे हे एकमेव साधन आहे. त्याच्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. याचा सर्वात मोठा फटका मच्छिमार बांधवांना बसला आहे. मच्छिमारांना आपल्या मुळगावी समुद्रमार्गे जिल्ह्यातील प्रमुख बंदरावर उतरण्याची व त्याच्या गावापर्यंत प्रवास करण्यासाठी परवानगी मिळावी व तसे संबंधित यंत्रणेला सुचना करव्यात अशा मागणीचे निवेदन वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
Fishermen should be allow to land at the main port of the district by sea and permission to travel to his village. The concerned system should be Notified . Statement of such demand Velneshwar ZP. Group member Netra Thakur handed over to the District Collector.
शासनाला मोठा महसूल मिळवून देणारा मच्छिमार व्यवसाय मच्छि दुष्काळामुळे आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच गेल्यावर्षापासून कोरोनाच्या पादुर्भावामुळे मासेमारी व्यवसायावर मोठे संकट ओढावले आहे. जिल्ह्यातील मच्छिमार मासेमारीसाठी खोल समुद्रात बोट घेऊन गेले आहेत. १५-१५ दिवस समुद्रात मासेमारी करत असतात. बहुतांश मच्छिमार हे मुंबई, रायगड, ठाणे या ठिकाणी समुद्रात मासेमारीसाठी लॉकडाऊन कालावधी पूर्वीच गेलेले आहेत. परंतु, या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मच्छिमार बांधवाना सद्यस्थितीत काही कामधंदा व रोजगार नसल्याने व शहर ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना आपल्या गावात येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्वांना गावी येणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन कालावधीत गुहागर तालुक्यातील काही मच्छिमार समुद्रमार्गे त्यांच्या गावी परतत असताना त्यांच्या बोटी मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे. यासाठी आपण जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना समुद्री मार्गे आपल्या गावी येण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.