वेळणेश्र्वरच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची योजना
गुहागर, ता. 15 : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत दिली जात आहे. वेळणेश्र्वर मधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम येणाऱ्या 150 विद्यार्थ्यांसाठी ही सवलत योजना जाहीर केली आहे. तसेच कोकणातील विद्यार्थ्यींनीसाठी कोकणकन्या शिष्यवृत्ती योजना सुरु आहे. त्यामुळे नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट 30 ते 60 हजार रुपयांची सवलत मिळत आहे. आता काही मोजक्याच जागा या सवलतीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावेत. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पवार केले आहे. (fee concession for engineering students)
Maharshi Parashuram Engineering College in Velneshwar has announced this concession scheme for the first 150 students. Also, Konkan Kanya Scholarship Scheme has been started for the students of Konkan. Therefore, the newly admitted students are getting a direct discount of Rs 30,000 to Rs 60,000. Now only a handful of seats will be eligible for this concession. Therefore, students seeking admission in engineering should confirm their admission as soon as possible. Such an appeal has been made by Prof. Avinash Pawar, principal of the MPCOE college. (fee concession for engineering students)
सध्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची दुसरी फेरी सुरु आहे. प्रथम वर्षाला किंवा थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने फी सवलत योजना जाहीर केली आहे. प्रथम किंवा द्वितीय वर्षांसाठी प्रवेश घेणाऱ्या पहिल्या 150 विद्यार्थ्यांना त्या वर्षामधील फीमध्ये सवलत दिली जात आहे. त्यामुळे एका वर्षाची संपूर्ण फी माफ होत आहे. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना असल्याने विद्यार्थ्यांना थेट 30 ते 60 हजार रुपयांचा दिलासा मिळत आहे. (fee concession for engineering students)
त्याचप्रमाणे कोकणकन्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत कोकणातील प्रथम वर्षाला किंवा थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थींनींना विशेष सवलत दिली जात आहे. त्यामुळे कोकणातील विद्यार्थींनींचीही 30 ते 60 हजार रुपये बचत होत आहे.
याबद्दल बोलताना महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पवार म्हणाले की, सर्वोत्तम शिक्षणाबरोबर बहुआयामी अभियंता घडविणे हे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रथम उद्दीष्ट आहे. या महाविद्यालयाच्या प्रागंणात गरीब श्रीमंत यापेक्षाही हुशार, नवकल्पनांची दृष्टी, वेगळा विचार करण्याची वृत्ती, मनापासून अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी अधिक महत्त्वाचे आहेत. त्यांचा अभियांत्रिकी शिक्षणाचा हक्क नाकारला जावू नये म्हणून आमचे महाविद्यालय कसोशीने प्रयत्न करत आहे. म्हणूनच फायद्याचा विचार न करता 150 विद्यार्थ्यांना आणि कोकण कन्यांना शिष्यवृत्ती देण्याचे धोरण विद्या प्रसारक मंडळाने निश्चित केले आहे. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे.
Fee concession for engineering students
The second round of admissions for the engineering course is currently underway. Maharshi Parashuram College of Engineering has announced a fee waiver scheme for first year or second year students directly. The first 150 students who are admitted for the first or second year are being given a discount in the fees for that year. Therefore, one year’s full fee is waived. As this scheme is for students of all categories, the students are getting direct relief of Rs. 30,000 to Rs. 60,000. Similarly, under the Konkan Kanya Scholarship Scheme, special concessions are being given to the Female students who are from Konkan region and admitted in the first year or directly in the second year. As a result, Girls from Konkan are also saving 30 to 60 thousand rupees.
Principal of Maharishi Parashuram Engineering College, Prof. Avinash Pawar said that the first objective of Maharishi Parashuram Engineering College is to develop a All Rounder Engineer with the best education. We are not interested who is economically Rich & Poor. Smart Student with vision of innovation, sincerely want to study engineering is Most important for us. His right to engineering education is not denied is our 1st Target. Therefore, Vidya Prasarak Mandal has decided to give scholarships to 150 students and Konkan girls without considering the benefits.