सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाची कारवाई
मुंबई, ता. 22 : बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट देऊन जीएसटी चोरी करणारे रॅकेट Fake ITC network सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने उध्वस्त केले आहे. या प्रकरणात भिवंडी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने 63 कोटींपेक्षा जास्त बनावट बिले तयार करुन 11 कोटी 40 लाख रुपयांचा जीएसटी चोरल्याचे उघड झाले आहे.
मुंबई सीजीएसटी विभागाला केंद्रीय गुप्तचर विभागाकडून जीएसटी चोरीबाबत Fake ITC network माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी ठाणे, भिवंडी, रायगड आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी समन्वयित कारवाई हाती घेतली. त्यामध्ये जीएसटी चोरी करणाऱ्या रॅकेटच्या मुख्य सुत्रधारापर्यंत अधिकारी पोचले.
मे. आदर्श स्क्रॅप ट्रेडर्सच्या भिवंडी येथील कंपनी बनावट बिलिंग आणि बनावट आयटीसी मिळवण्यात आणि दुसर्यांना देण्यात सहभागी होती. त्यांनी 63 कोटींपेक्षा जास्त बनावट बिले तयार करून किंवा पावती न देता सुमारे 63 कोटींचा व्यवहार केला. आणि 11.4 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता. Fake ITC network
तपासाअंती मे. आदर्श स्क्रॅप ट्रेडर्सच्या मालकाने बोगस बिलिंग आणि बनावट आयटीसी रॅकेट Fake ITC network चालवल्याचे कबूल केले. त्याला सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत 21.01.2022 रोजी अटक करण्यात आली. शनिवारी 22.1.2022 रोजी फोर्ट, मुंबई इथल्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. मा. न्यायालयाने आरोपीला 4.02.2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.