भरारी पथकारी कारवाई, 1 लाख ४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल
गुहागर : तालुक्यातील नरवण येथे राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरीच्या भरारी पथकाने आज छापा टाकला. यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याच्या 750 मिली मापाच्या गोल्डन एस व्हिस्की, मॅकडॉल नं. २ व्हिस्की, महाराष्ट्रातील विदेशी मद्य व गावठी हातभट्टी दारुचा साठा भरारी पथकाने जप्त केला. या मुद्देमालाची एकूण किंमत 1 लाख 4 हजार 80 इतकी आहे. सदर कारवाईत संशयीत आरोपी प्रविण पांडुरंग जाधव रा. नरवण यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील तरतूदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाचे भरारी पथकाने केली. त्यामध्ये दुय्यम निरीक्षक किरण पाटील, एस.एम.सावंत, जवान व्ही. एस. विचारे, एन. एस. सुर्वे, एस. ए. पवार सहभागी झाले होते. या गुन्ह्याचा पुढील तपास किरण पाटील करीत आहेत.
जिल्ह्यात नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी बेकायदा दारुधंद्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. त्याचवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त वाय. एम. पवार व रत्नागिरी जिल्ह्याचे अधिक्षक डॉ. बी.एच. तडवी यांनी देखील जिल्ह्यात दारुबंदी कायद्यांतर्गत कारवाईला सुरवात केली आहे. त्यामुळे बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.