सरासरी 72.67 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी, ता. 29 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 72.67 मिमी तर एकूण 654.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि लांजा या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात 116 मिमी नोंदला गेला. Excess rain in four talukas

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 85.00 मिमी, दापोली 58.00 मिमी, खेड 39.00 मिमी, गुहागर 90.00 मिमी, चिपळूण 99.00 मिमी, संगमेश्वर 69.00 मिमी, रत्नागिरी 38.00 मिमी, राजापूर 60.00 मिमी, लांजा 116.00 मिमी. असा आहे. Excess rain in four talukas
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 28 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. Excess rain in four talukas
दापोली तालुक्यात 27 जून रोजी अतिवृष्टीमुळे मौजे गिमोणे, ग्रुप ग्रामपंचायत इमारतीला लागून असलेली 25 फुट लांब संरक्षक भिंत पडल्याने अंदाजे रक्कम रु. 15 हजार रुपयांचे नुकसान तर मौजे पंढरी, येथील रघुनाथ हरिश्चद्र श्रावणपाटील यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात दाभोळे येथे तुकाराम गंगाराम शिवगण यांच्या मालकीचे पाच जनावरे (२ बैल, २ वासरे, १ गाय) अचानक मरण पावली आहेत. असे निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे. Excess rain in four talukas

