महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम
गुहागर, ता. 18 : उर्जा बचत आणि संवर्धन या विषयावर जितेंद्रकुमार राठोड यांच्या वेबिनारचे आयोजन महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले होते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मधील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला. Energy Conservation Webinar
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक १४ डिसेंबर रोजी ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त एका विशेष वेबिनारचे ( Energy Conservation Webinar) आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळाचे ज्येष्ठ कार्यकारी अभियंता जितेंद्रकुमार राठोड यांनी वेबिनारमध्ये ऊर्जेच्या बचतीचे विविध मार्ग अतिशय सोप्प्या पद्धतीने समजावून सांगितले. ऊर्जेच्या बचतीमधून आपल्या विजेचे बिल तर कमी येतेच पण त्याद्वारे त्याचा पर्यावरणावर सुद्धा कसा अनुकूल परिणाम होतो आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी व्हायला कसा हातभार लागतो यावर सुमारे दोन तास विस्तृत मार्गदर्शन केले.
या वेबिनार करिता रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील सर्व पदवी आणि पदविका महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. या सर्व ठिकाणांहून जवळपास सुमारे २०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते. वेबिनारच्या शेवटी प्रश्नोत्तरांच्या सत्रात अनेकांनी सहभाग घेतला. विशेष बाब म्हणजे पेढाम्बे येथील मंदार डिप्लोमा कॉलेज आणि सावंतवाडी येथील भोसले पॉलिटेक्निक या दोन महाविद्यालयांनी वर्गामध्ये प्रोजेक्टर लावून सर्व विद्यार्थ्यांना हा वेबिनार पहाण्याची संधी उपलब्ध करुन दिली. Energy Conservation Webinar
या वेबिनारच्या यशस्वीततेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अविनाश पवार, विद्युत विभागाचे प्रमुख श्री. सतिश घोरपडे यांनी विशेष मेहनत घेतली.